शेतकरी आंदोलक सन्मानजनक तोडगा शोधण्याच्या बेतात; सरकार – संसद – शेतकरी झुकणार नसल्याचे राकेश टिकैतांचे वक्तव्य


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या हिंसाचारानंतर शेतकरी नेते बॅकफूटवर गेल्याचे चित्र निर्माण होत असताना प्रसारमाध्यमांनी मात्र, अश्रूंचे भांडवल केले… तरी शेतकरी आंदोलनाचे नेते सरकारशी समझोता करून सन्मानजनक तोडगा शोधण्याच्या बेतात आल्याचे त्यांच्या वक्तव्यातून दिसत आहे.rakesh tikat sets a softer tune, says, govt – parliament and farmers will not be bowed down

आम्ही सरकारला – संसदेला आणि शेतकऱ्याच्या पगडीला झुकू देणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सन्मान ठेऊन बातचीत करायला तयार आहोत. आमच्या आंदोलकांना अटक झाली आहे. त्यांना सोडून द्यावे, असे वक्तव्य शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांनी केले आहे. या वक्तव्याचे बिटविन द लाइन वाचले तर लक्षात येते की… पूर्वी तीनही कृषी कायदे संपूर्ण मागे घेण्याची बात करणारे शेतकरी नेते आता शेतकऱ्याच्या – सरकारच्या आणि संसदेच्या सन्मानाची बात करत आहेत. कृषी कायदे संसदेने मंजूर केलेले आहेत.ते संपूर्ण मागे घेतले जाऊ शकत नाहीत. त्यात चर्चा करून बदल केला जाऊ शकतो, हे शेतकरी आंदोलनाच्या नेत्यांना मनोमन पटले आहे. त्यातूनच सरकार – संसद आणि शेतकरी यांना झुकू देणार नाही, ही भाषा आलेली दिसते आहे.

परंतु, सूरूवातीलाच कृषी कायदे संपूर्ण मागे घेण्याची भूमिका घेतल्याने त्यापासून संपूर्ण यू टर्न घेता येत नाही, ही शेतकरी आंदोलक नेत्यांची अडचण आहे. त्यामुळे हळूहळू सरकारशी बातचीत करून कृषी कायद्यांमध्ये आपल्याला हवी तशी लवचिकता आणण्याचाही शेतकरी आंदोलक नेत्यांचा हा प्रयत्न मानण्यात येतो आहे.

प्रजासत्ताक दिनी ज्याने लाल किल्ल्यावर भारतीय ध्वज उतरवून दुसरा झेंडा फडकवला, त्याला सरकारने पकडावे, अशी मागणी राकेश टिकैत यांनी केली आहे. त्याची बातमी प्रसारमध्यमांनी आक्रमकपणे देऊन राकेश टिकैत यांच्या तडजोडीच्या भूमिकेकडे दुर्लक्ष केले आहे. टिकैत यांच्या वक्तव्याला प्रसारमाध्यमांनीच आक्रमक रूप प्रसिद्ध करून शेतकरी आंदोलक तडजोडीच्या भूमिकेत आले नसल्याची स्वतःची मखलाशी केली आहे.

rakesh tikat sets a softer tune, says, govt – parliament and farmers will not be bowed down

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती