पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात राजकारण करू पाहणाऱ्यांना राकेश टिकैत यांनीच फटकारले

कृषि कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकरी आंदोलनाच्या आडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्याची संधी शोधणाऱ्यांना शेतकरी नेते राकेश टिकैत यांनीच फटकारले आहे. मोदींच्या विरोधात आंदोलन असल्याचे वातावरण निर्माण झाल्यास शेतकरी आपल्याविरोधात जातील अशी भीती असल्याने टिकैत यांनी ही भूमिका घेतल्याचे म्हटले जात आहे.Rakesh Tikait who slammed those who tried to do politics against Prime Minister Narendra Modi


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकरी आंदोलनाच्या आडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्याची संधी शोधणाऱ्यांना शेतकरी नेते राकेश टिकैत यांनीच फटकारले आहे. मोदींच्या विरोधात आंदोलन असल्याचे वातावरण निर्माण झाल्यास शेतकरी आपल्याविरोधात जातील अशी भीती असल्याने टिकैत यांनी ही भूमिका घेतल्याचे म्हटले जात आहे.

गाझीपूर सीमेवर काही आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिका केली होती. दरम्यान, यानंतर टिकैत यांनी संताप व्यक्त करत आपल्या व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कोणीही अपशब्दांचा वापर करू शकत नाही आणि अपशब्दांचा वापर करणाऱ्यांना आपल्या व्यासपीठावर जागा नाही, असे सांगितले.

ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आपल्या व्यासपीठावरून कोणीही अपशब्दांचा वापर करू शकत नाही. काही लोकं मोंदीविरोधात अपशब्दांचा वापर करत आहेत अशा तक्रारी आल्या आहेत. ती आपले लोकं असूच शकत नाहीत. जी लोकं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अपशब्दांचा वापर करतील त्यांनी या ठिकाणाहून निघून जावं.तो त्याचा व्यक्तीगत निर्णय असेल. त्याला या व्यासपीठाचा वापर करू दिला जाणार नाही. जी लोकं कोणतीही आक्षेपार्ह वक्तव्य करतील त्यांच्याबद्दल आम्हाला सांगा. त्यांना हे व्यासपीठ सोडावंच लागेल. ते त्यांचं वैयक्तिक वक्तव्य असेल. या ठिकाणचं वातावरण बिलकुल खराब केलं जाऊ नये. जर आम्हाला कोणतीही गोष्ट योग्य वाटत नसेल तरी कोणाबद्दल अपशब्द काढण्याचे आपल्याला अधिकार नाहीत.

दिल्लीच्या सीमावर्ती भागांत सुरू असलेले आंदोलन पूर्णपणे राजकीय झालं आहे. हे आंदोलन राजकीय अजेंड्याचा भाग आहे. कॅनडा, ब्रिटिशमधील राजकीय नेते, काही सेलिब्रिटी आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे हे आंदोलन म्हणजे भारताविरोधात सुरू असलेला अजेंडा आहे. यामुळे देशाच्या शांततेला धोका निर्माण झाला आहे, असा आरोप भारतीय किसान संघाचे राष्ट्रीय सचिव बद्री नारायण चौधरी यांनी केला आहे.

Rakesh Tikait who slammed those who tried to do politics against Prime Minister Narendra Modi

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*