फक्त दोन हजार रुपयांसाठी राकेश टिकैत कोठेही जातात, भाजपा आमदार नंदकिशोर गुर्जर यांचा आरोप

फक्त २००० रुपयांसाठी राकेश टिकैत हे कुठेही जातात, असा आरोप गाझियाबादचे भारतीय जनता पक्षाचे आमदार नंद किशोर गुर्जर यांनी केला.Rakesh Tikait goes anywhere for just 2000 alleges BJP MLA Nandkishore Gurjar


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : फक्त २००० रुपयांसाठी राकेश टिकैत हे कुठेही जातात, असा आरोप गाझियाबादचे भारतीय जनता पक्षाचे आमदार नंद किशोर गुर्जर यांनी केला.

आमदार नंद किशोर गुर्जर आणि त्यांच्या समर्थकांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना धमकावल्याचा आणि त्यांना जबरदस्तीने आंदोलनाच्या ठिकाणावरून हटवल्याचा आरोप राकेश टिकैत यांनी केला होता.यावर गुर्जर म्हणाले की, मीही शेतकरी आहे. राकेश टिकैत हे माझ्यापेक्षा मोठे शेतकरी नाहीत. त्यांच्याकडे माझ्याइतकी जमीनही नाही. राकेश टिकैत यांनी माफी मागितली पाहिजे. ते देशातील शेतकऱ्यांमध्ये फूट पाडू शकत नाही.

इतिहास हे लक्षात ठेवेल. आंदोलनात शेतकरी नाहीत. तिथे बसलेले बहुतेक जण हे राजकीय पक्षांशी संबंधीत आहेत. ते शेतकरीही असू शकतात आणि मजूरही.

गेल्या आठवड्यात प्रशासनाने आंदोलनाचे ठिकाण रिकामे केल्यानंतर शेतकरी नेते राकेश टिकैत हे कॅमेऱ्यासमोर भावूक झाले आणि रडले. हे आंदोलन दडपण्यासाठी कट रचल्याचा आरोप त्यांनी केला. टिकैत कुटुंबाचा आदर करतो.

पण काही लोक म्हणतात की राकेश टिकैत २००० रूपयांसाठी कुठेही जातात. हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांनी असं करू नये. तुम्ही असे आरोप का करता? उद्या तुम्ही म्हणाल अतिरेकी मारण्यासाठी आले होते. आपण शेतकरी आंदोलनावरून गोंधळाची स्थिती निर्माण करत आहेत. आंदोलन शांततेत असले पाहिजे, असं आमदार गुर्जर म्हणाले.

Rakesh Tikait goes anywhere for just 2000 alleges BJP MLA Nandkishore Gurjar

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*