औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर झालेच पाहिजे; खासदार संभाजी राजेंची मागणी

विशेष प्रतिनिधी 

नाशिक : ज्या क्रूरकर्मा औरंगजेबाने छत्रपति संभाजी महाराजांना क्रूरपणे पकडून मारले, त्याचे नाव महाराष्ट्रातल्या एका मोठ्या शहराला असणे हे दुर्दैवीच आहे. त्यामुळे औरंगाबादचे नामकरण लवकरात लवकर संभाजीनगर करावे, अशी आग्रही मागणी राजर्षि छत्रपति शाहू महाराजांचे वंशज खासदार संभाजी राजे यांनी केली आहे. rajya sabha MP sambhaji raje favours renaming aurangabad to sambhaji nagar

औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर व्हावे, ही अवघ्या महाराष्ट्राची भावना आहे. ज्या मोंगल बादशहाने छत्रपति संभाजी महाराजांना पकडून क्रूरपणे मारले, त्याचे नाव आपल्या महाराष्ट्रातील एका मोठ्या शहराला असणे हे खरोखर दुर्दैवी आहे.

rajya sabha MP sambhaji raje favours renaming aurangabad to sambhaji nagar

त्यामुळे सर्व शिवभक्तांच्या आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा विचार करून ठाकरे – पवार सरकारने औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अशी माझी मागणी आहे, असे खासदार संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*