सगळं उघड केले तर कॉंग्रेसला तोंड दाखविणेही अवघड, राजनाथ सिंह यांचा इशारा


काँग्रेससह काही राजकीय पक्ष देशाच्या सैन्याच्या शौर्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. चीनने भारताची बाराशे चौरस किलोमीटर जमीन ताब्यात घेतली, असं काँग्रेस म्हणत आहे. पण आपण जर सगळं उघड केले ना तर काँग्रेसला तोंड दाखवायलाही अवघड होईल, असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिला. rajnath singh latest news


वृत्तसंस्था

पाटणा : काँग्रेससह काही राजकीय पक्ष देशाच्या सैन्याच्या शौर्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. चीनने भारताची बाराशे चौरस किलोमीटर जमीन ताब्यात घेतली, असं काँग्रेस म्हणत आहे. पण आपण जर सगळं उघड केले ना तर काँग्रेसला तोंड दाखवायलाही अवघड होईल, असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिला.rajnath singh latest news

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सभांना संबोधित करताना राजनाथ सिंह म्हणाले, तुम्ही सुशिक्षित नागरिक आहात. १९६२ ते २०१३ दरम्यानचा इतिहास बघा. आपल्या सैन्यातील जवानांनी जे शार्य दाखवले आहे त्याने अभिमानाने मान उचांवते. संरक्षणमंत्री म्हणून मी आपल्याला सांगतो. भारताच्या एक इंच जमिनीवरही कब्जा करण्याची कोणत्याही देशाची हिंमत नाही.rajnath singh latest news

आपल्या बिहार रेजिमेंटच्या २० जवानांनी बलिदान देऊन भारत मातेच्या स्वाभिमानाची रक्षा केली असल्याचे राजनाथसिंह यांनी सांगितले. ते म्हणाले की, ज्या मातांनी या शूर जवानांना जन्म दिला त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. बलिदान देऊन ज्यांनी भारताच्या स्वाभिमानाचे रक्षण केले आहे, आज त्यांच्यामुळे जगातील कुठलाही देश भारताची एक इंच जमीनही ताब्यात घेण्याचे धाडस करू शकत नाही.

rajnath singh latest news

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे कौतुक करताना राजनाथ सिंह म्हणाले, फक्त बिहारच काय तर देशातील एकही व्यक्ती त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करू शकत नाही. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी हे काम का केले नाही किंवा हे काम का केले यावरून चर्चा होऊ शकते. पण त्यांच्यावर कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराचा आरोप कुणालाही करता येणार नाही. इतकी त्यांची स्वच्छ प्रतिमा आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती