चीन सीमेवर जाऊन संरक्षण मंत्र्यांचे शस्त्रपूजन; भारतीय सैन्य कोणालाही एक इंचही भूमी घेऊ देणार नाही


  • चीनशी सीमावादावरील तणाव संपला पाहिले अशी भारताची इच्छा : राजनाथ सिंहसिंह

वृत्तसंस्था

दार्जिलिंग : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज विजयादशमी निमित्त दार्जिलिंगमधील सुकना युद्ध स्मारकात शस्त्रपूजन केले. चीनशी तणाव असताना संरक्षणमंत्र्यांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर चीन सीमेवर जाऊन जवानांचे शस्त्र पूजनाने मनोधैर्य वाढवणे याला रणनैतिक महत्त्व आहे.rajnath singh news

चीनसोबतचा सीमावादावर सुरू असलेला तणाव संपला पाहिले अशी भारताची इच्छा आहे. या भागात शांती कायम राहावी. परंतु, आपले सैन्य आपल्या जमिनाचा एक इंचाही भाग कोणाला देणार नाही असा मला विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले. याआधी रविवारी सकाळी त्यांनी नाथू ला पास येथे येऊन दसर्‍याच्या दिवशी सैनिकांच्या शुभेच्छा दिल्या.


संरक्षण मंत्री पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या 2 दिवसीय दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्यासोबत लष्करप्रमुख मनोज नरवणे देखील उपस्थित होते. राजनाथ यांनी सकाळी ट्विटरद्वारे देशवासियांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, भारतीय सेनेच्या जवानांशी भेट घेतल्यास मला खूप आनंद होते. त्यांचे मनोबल उंचावले गेले आहे. त्यांचे कितीही कौतुक केले तरी ते कमीच आहे. राजनाथ यांनी शनिवारी दार्जिलिंगच्या सुकना येथील 33 कोरच्या मुख्यालयाचा दौरा पूर्ण करून पूर्व क्षेत्रातील सैन्याच्या तयारीचा आढावा घेतला होता.

‘सैनिकांचे धाडस सुवर्ण अक्षरात लिहिले जाईल’ संरक्षण मंत्री म्हणाले की, लडाखमध्ये भारत-चीन सीमेवर जे काही झाले आणि आपल्या जवानांनी ज्याप्रकारे शौर्याने प्रत्युत्तर दिले, इतिहासकार आपल्या जवानांची ती वीरता आणि साहला सुवर्ण अक्षरात लिहितील.

rajnath singh news

15 जून रोजी लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत-चिनी सैन्यामध्ये हिंसक झडप झाली होती. यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले होते. चीनचे 40 पेक्षा जास्त सैनिक ठार झाले होते. सीमेवरील तनाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये 7 वेळा चर्चा झाली आहे. लडाखमध्ये चिनी सैन्याशी लढा देण्यासाठी भारताने सुमारे 60,000 सैनिक तैनात केले आहेत.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था