Farmers Violence : सलग दुसऱ्यांदा राजदीप सरदेसाई यांच्याकडून फेक न्यूज शेअर; शेतकऱ्याच्या डोक्यात गोळ्या घातल्याची दिली होती बातमी


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिल्ली येथे शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर परेडवेळी उफाळून आलेल्या हिंसाचारावेळी ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी केलेले दोन ट्विट वादात सापडले आहेत. Rajdeep Sardesai’s throw; Controversial tweet during Delhi violence

दिल्लीतील प्राप्तिकर कार्यालयाजवळ काल एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. त्याचे नेमके कारण माहित नसताना राजदीप यांनी नवनीत सिंह या शेतकऱ्याचा मृत्यू पोलिसांची गोळी लागून झाल्याचे ट्विट केले. अर्थात पोलिसांनी केलेल्या कथित गोळीबारात शेतकरी ठार झाला, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले होते. परंतु, अशा ट्विटमुळे हिंसा भडकू शकते, याचे भान त्यांनी राखले नाही. गोळीबारात शेतकरी दगावला, ही बातमी खोटी ठरताच त्यांनी हे ट्विट डिलीट केले.

त्यानंतर दुसरे ट्विट त्यांनी केले. त्यात त्यांनी म्हटले की, ट्रॅक्टर उलटून शेतकऱ्याचा मृत्यू झाला, हे व्हिडिओत स्पष्ट दिसते. ट्रॅक्टरवर असलेल्या नवनीत सिंह याचा मृत्यू पोलिसांनी केलेल्या गोळीबारात झाला, असा दावा आंदोलकांनी केला आहे. पण , व्हिडिओत बेरिकेड्स हटविताना ट्रॅकर उलटला, हे दिसते. शेतकरी आंदोलकांचा दावा खोटा आहे. आता शवविच्छेदनाची प्रतीक्षा आहे.
त्यानंतर त्यांनी पोलिसांचे कौतुक करणारे ट्विट केले. त्यात पोलिसांनी संयम दाखविला. त्यांनी गोळीबार केलेला नाही , असे ट्विट केले. एकीकडे फेक न्यूज आणि व्हॅटसअप युनिव्हर्सिटी विरोधात आवाज बुलंद करणारे राजदीप यांनी स्वतःच फेकन्यूज चालविल्याचे या निमित्ताने उघड झाले. तसेच या प्रकरणी त्यांनी माफीही मागितलेली नाही. राजदीप यांचे ट्विटरवर 90 लाख फोलोअर्स आहेत. अशा संवेदनशील घटनेवेळी त्यांनी केलेल्या एका ट्विटमुळे आंदोलन आणखी भडकण्याची शक्यता होती.

नेताजी बोस यांचे चित्र खोटे असल्याचा दावाही फोल

यापूर्वी त्यांनी राष्ट्रपती भवनात लावलेले नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे चित्र खरे नसल्याचे ट्विट केले होते. अभिनेता प्रसेनजीत यांचे चित्र बोस यांचे म्हणून लावल आहे, असे सांगून खळबळ उडवून दिली. पण, वस्तुस्थिती तशी नव्हती. ते चित्र नेताजींचेच होते आणि नेताजी यांचे नातू जयंती बोस यांनी दिलेल्या चित्रावरून पद्मभूषण सन्मानप्राप्त चित्रकार परेश महती यांनी रेखाटलेले चित्रच राष्ट्रपती भवनात लावले आहे.

Rajdeep Sardesai’s throw; Controversial tweet during Delhi violence

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था