परमवीरना बाजूला का केले…??, केंद्राने चौकशी केली, तर महाराष्ट्रात फटाक्यांची माळ लागेल; सचिन वाझे तर मुख्यमंत्र्यांचा खास होता; राज ठाकरेंचा घणाघात

प्रतिनिधी

मुंबई : मनसुख हिरेन – सचिन वाझे – परमवीर सिंग प्रकरणात एका पाठोपाठ एक खुलासे होताहेत… केंद्र सरकारने या सगळ्या प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी केली तर कल्पनेच्या पलिकडचीही नावे पुढे येतील…, असा खळबळजनक विधान मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले आहे.Raj Thackeray throws solvo at Uddhav Thackeray over his realtions with sachin vaze

केंद्र सरकारने या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी आज पत्रकार परिषदेत केली आहे. केंद्राने या प्रकरणाची नीट चौकशी केली तर कल्पनेपलीकडचे अनेक चेहरे समोर येतील, असे सूचक विधानही राज ठाकरे यांनी केले.राज ठाकरे यांनी ठाकरे – पवार सरकारवर टीका करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, की बदली केलेले पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप हे राज्याच्याच काय देशाच्या इतिहासातली पहिली घटना आहे.

परमवीर सिंग यांना एक वर्ष झाले आहे. त्या हिशेबाने पाहिले तर 1200 कोटी रूपये झाले असतील. गृहमंत्र्यांनी पोलीसांना पैसे गोळा करायला सांगणे हे मुंबई पुरते आहे. राज्यात अनेक जिल्हे आहे तिथे सुद्धा असे प्रकार घडले असतील. त्यामुळे अनिल देशमुख यांचा राजीनामा घेऊन कसून चौकशी केली पाहिजे, अशी मागणी राज ठाकरेंनी केली.

स्फोटके कोणाच्या सांगण्यावरून ठेवली…

मुकेश अंबानींच्या घराजवळ मायकल रोडवर जी स्फोटके कारमध्ये सापडली होती. ती स्फोटके आली कुठून हा मोठा प्रश्न आहे. याचे उत्तर अजूनही समोर आलेले नाही. निलंबित असलेल्या सचिन वाझे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा खास होता. सचिन वाझे यांना शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी कोण घेऊन गेले होते, हे समोर आले पाहिजे. असा थेट सवाल राज ठाकरे यांनी शिवसेनेला केला आहे.

मायकल रोडवर स्फोटकांनी भरलेली गाडी तिथे कुणी ठेवायला सांगितली, एक पोलीस अधिकारी हे सगळे करतोय हे गंभीर आहे. हे कुणाच्या सांगण्यावरून झाले हे समोर आले पाहिजे. केंद्र सरकारने या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे, राज्य सरकारकडून या प्रकरणाचा तपास होणार नाही. केंद्राने जर चौकशी केली तर फटाक्यांची माळ लागेल, या प्रकरणाचा नीट तपास केला तर कल्पनेपलीकडेच चेहरे समोर येतील, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.

Raj Thackeray throws solvo at Uddhav Thackeray over his realtions with sachin vaze

 

 

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*