सीबीआयच्या मुख्यालयावरच छापा, डीएसपीसह चार जणांविरुध्द गुन्हा दाखल


केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने आपल्याच मुख्यालयावर छापा टाकून चार अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे. डीएसपी, इन्स्पेक्टरसह चार जणांविरुध्द गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने आपल्याच मुख्यालयावर छापा टाकून चार अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे. डीएसपी, इन्स्पेक्टरसह चार जणांविरुध्द गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.  Raid on CBI headquarters, case filed against four persons including DSP

सीबीआयने याप्रकरणी छापे टाकण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर असे आढळले की, निरीक्षक कपिल धनकड यांनी पोलीस उपअधीक्षक आर. के. संगवान आणि आर. के. ऋषी यांच्याकडून प्रत्येकी १० लाख रुपये घेतले आहेत. श्री श्याम पल्प अ‍ॅण्ड बोर्ड मिल्सने बँकेची ७०० कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. फ्रॉस्ट इंटरनॅशनलने बँकेची ३६०० कोटी रुपयांची फसवणूक केली आहे या कंपन्यांवर संगवान आणि ऋषी यांची मेहेरनजर होती, असे आठ पानांच्या एफआयआरमध्ये म्हटले आहे.लाचखोरीप्रकरणी सीबीआयच्या ज्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यांनी तपासामध्ये तडजोड करण्यासाठी केवळ नियमितपणे दलालीच मिळत नव्हती तर हे अधिकारी जनतेच्या पैशांचा अपहार केल्याचा आरोप असलेल्या कंपन्यांच्यावतीने अन्य अधिकाऱ्यांनाही लाच देत होते, असा आरोप या अधिकाऱ्यांविरुद्ध नोंदविलेल्या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.

संगवान, ऋषी, धनकड आणि लघुलेखक समीरकुमार यांनी अरविंदकुमार गुप्ता आणि मनोहर मलिक व अन्य आरोपींसमवेत कारस्थान रचले आणि आर्थिक लाभासाठी तपासात हयगय केली, असेही एफआयआरमध्ये म्हटले आहे. सीबीआयच्या पथकाने १४ ठिकाणी तपासणीही केली. यामध्ये चौघांच्या दिल्ली, गाझियाबाद, नोईडा, मीरत, कानपूर या निवासस्थानी छापे घालण्यात आले.

यातील एक डीएसपी हा गेल्या अनेक वर्षांपासून बॅंकींग आणि सिक्युरिटी फ्रॉड सेलमध्ये काम करत होता. त्यांचे बॅंकेच्या फ्रॉडच्या अनेक प्रकरणांमध्ये संबंध आहे. फसवणूक करणाऱ्या कंपन्यांचे प्रवर्तक आणि काही दलालांशी त्यांचे जवळचे संबंध होते. त्यांच्यामार्फतच तो लाचखोरी करत होता.

दोन वर्षांपासूनच सीबीआयने या अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवण्यास सुरूवात केली होती. त्यासाठी अ‍ॅंटी करप्शन विभागाच्या एका अधिकाऱ्याची नियुक्तीही केली होती.

Raid on CBI headquarters, case filed against four persons including DSP

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी