रायबरेलीची वाटचाल अमेठीच्या दिशेने; काँग्रेसच्या जुन्या ३५ स्थानिक नेत्यांचे सोनियांकडे राजीनामे


वृत्तसंस्था

रायबरेली : रायबरेलीची वाटचाल अमेठीच्या दिशेने सुरू झाल्याची राजकीय चिन्हे दिसायला लागली आहेत. अमेठीत राहुल गांधींचा पराभव झाला आहे. त्याचीच पुनरावृत्ती रायबरेलीत होऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे… कारण काँग्रेस संघटनांच्या निवडणुकीत स्थान न दिल्याने रायबरेलीतील ३५ जुन्या काँग्रेसनिष्ठ नेत्यांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नावे पत्र लिहून राजीनामे पाठविले आहेत. सोनिया गांधी रायबरेलीच्या खासदार आहेत. पंतप्रधान इंदिरा गांधीपासून या मतदारासंघात गांधी कुटुंबीयच निवडून येत आहेत.raibareli turing politically into amethi, may loose loksabha seat soon

काँग्रेसच्या अंतर्गत निवडणुकीत बाहेरच्या पक्षातून आलेल्या नेत्यांना आणि स्थानिक कार्यकर्त्यांना स्थान देण्यात आले पण स्थानिक आणि जुन्या नेत्यांना डावलण्यात आले, याचा जुन्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना राग आला आहे. त्यातून हे राजीनामा नाट्य घडले आहे. हे नेते कोणी ब्लॉक अध्यक्ष, रायबरेली शहरातील वॉर्ड अध्यक्ष अशा पदांवर काम केलेले स्थानिक नेते आणि कार्यकर्ते आहेत.ग्रेसमध्ये सोनिया गांधींच्या प्रचारासाठी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काम केले आहे. मध्यंतरी काँग्रेसमध्ये बाहेरच्या पक्षांमधून नेते आणि कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यात आला. आता त्यांच्या पदाधिकारी म्हणून निवडीही झाल्या आहेत. यावर हे नेते चिडले आहेत. त्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून नाराजी कळविली आहे. त्याचबरोबर राजीनामा पत्रेही जोडली आहेत.

raibareli turing politically into amethi, may loose loksabha seat soon

अर्थात रायबरेलीच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी असली पत्रे जिल्हा काँग्रेस कमिटीकडे आली नसल्याचे म्हटले आहे. मात्र, अमेठी जशी काँग्रेसच्या हातातून निसटली तशी रायबरेली देखील निसटू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. रायबरेली इंदिराजींचा बालेकिल्ला असला तरी १९७७ निवडणूकीत इंदिराजींना याच मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला होता. हा इतिहास आहे

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती