राहुल गांधींचा अजब तर्क, म्हणाले शेतकरी मजबूत झाला तर सैन्याची गरजच नाही


जय जवान, जय किसान ही घोषणा माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दिली होती. मात्र, त्यांच्याच पक्षाचे खासदार राहुल गांधी यांनी कमालीचा तर्क मांडला आहे. शेतकरी मजबूत झाला तर देशाला सैन्याची गरजच पडणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. Rahul Gandhi’s strange argument is that if the farmers become strong then there is no need for army


वृत्तसंस्था

चेन्नई : जय जवान, जय किसान ही घोषणा माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दिली होती. मात्र, त्यांच्याच पक्षाचे खासदार राहुल गांधी यांनी कमालीचे अजब तर्कट मांडले आहे. शेतकरी मजबूत झाला तर देशाला सैन्याची गरजच पडणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

तामीळनाडूच्या दौऱ्यात एका भाषणात राहुल गांधी यांनी हा अजब तर्क मांडला. ते म्हणाले की, जर भारतामध्ये शेतकरी, श्रमिक आणि कामगार मजबूत झाले तर सीमेवर सैन्याची गरज नाही. लष्कर, नौसेना आणि हवाईदल तैनात ठेवण्याची गरजच नाही. शेतकरी आणि मजुरांना सुरक्षा दिली तर विशेषत: भारत-चीन सीमेवर सैन्याची गरजच नाही. कारण चीन भारतीय सीमेवर घुसण्याची हिंमतच करणार नाही.शेतकरी आणि मजुरांना मजबूत व्हायला हवेत याबाबत कोणाचे दूमत नाही, परंतु याचा सैन्याशी काय संबंध असा सवाल राहुल गांधी यांना केला जात आहे. शेतकरी सीमेवर लढायला जाणार आहेत का? असेही विचारले जात आहे. राहुल गांधी यांचे हे अजब तर्क ऐकून त्यांच्या भाषणाचा तामीळमध्ये अनुवाद करणारा अनुवादकही बेशुध्द पडल्याचे सोशल मीडियावर म्हटले जात आहे. प्रा. मोहम्मद इमरान हे राहुल गांधी यांच्या भाषणाचा अनुवाद करत होते. भाषण झाल्यावर काही मिनिटांतच ते बेशुध्द पडले.

Rahul Gandhi’s strange argument is that if the farmers become strong then there is no need for army

भारतीय जनता पक्षाचे आमदार सी. टी. रवी यांनी राहुल गांधींवर टीका करताना म्हटले आहे की, आपल्या लष्कराच्या शौर्यावरच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, हे अत्यंत लज्जास्पद आहे

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था