Rahul Gandhi's question Why did the names of dictators start with M, netizens replied Comedians List Starting With R

राहुल गांधींचा प्रश्न- हुकूमशहांची नावे M ने का सुरू होता, नेटकऱ्यांनी प्रत्युत्तरात दिली R आद्याक्षराच्या कॉमेडियन्सची यादी

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकत्याच केलेल्या ट्वीटवरून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे. म्यानमारमधील सैन्याच्या उठावावरून राहुल गांधींनी ट्वीट केले की, हुकूमशहांची नाव M अक्षराने का सुरू होतात? असे विचारून त्यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान मोदींना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु नेटकऱ्यांनी त्यांची चांगलीच क्लास लावल्याचे पाहायला मिळाले. Rahul Gandhi’s question Why did the names of dictators start with M, netizens replied Comedians List Starting With R


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकत्याच केलेल्या ट्वीटवरून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे. म्यानमारमधील सैन्याच्या उठावावरून राहुल गांधींनी ट्वीट केले की, हुकूमशहांची नाव M अक्षराने का सुरू होतात. यासोबत राहुल गांधींनी मार्कोस, मुसोलिनी, मुबारक, मोबुटू, मुशर्रफ, मिकेम्बेरो अशी नावांची यादी जोडली. राहुल गांधींनी M आद्याक्षर घेऊन अप्रत्यक्षपणे पंतप्रधान मोदींना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.

राहुल गांधींच्या या ट्वीटनंतर प्रतिक्रियांचा पाऊस सुरू झाला आहे. क्षुल्लक व्हॉट्सअॅप मेसेज फॉरवर्ड करून राहुल गांधी स्वत:सोबत पक्षाचाही मान कमी करत असल्याची टीका ट्वीटरवर सुरू झाली आहे. राहुल गांधींना रिप्लाय देत नेटकऱ्यांनी त्यांच्यावर मीम्सच्या माध्यमातून टीकेची झोड उठवली आहे. राहुल यांच्या ट्वीटला रिप्लाय देताना नेटकऱ्यांनी त्यांना अनेक कॉमेडियन्सची नावे R ने सुरू होतात, अशी आठवणही करून दिली.

एवढेच नाही, तर एका युजरने लिहिले की, M आद्याक्षर अशा महान नेत्याचे आहे, ज्यांच्या नावावर तुमचा पक्ष उभा आहे. आणखी एका युजरने लिहिले की, मनमोहनसिंग हे हुकूमशहा नव्हते, तर ते रोबोट होते. त्यामुळे माजी पंतप्रधानाबद्दल खोटे बोलणे थांबवा… आणखी एका युजरने राहुल गांधींना रिप्लाय देत M आद्याक्षरापासून सुरू होणाऱ्या महापुरुषांची यादी दिली आहे.

 

Rahul Gandhi’s question Why did the names of dictators start with M, netizens replied Comedians List Starting With R

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*