भारताच्या लोकशाहीवरच राहूल गांधी यांचे प्रश्नचिन्ह, म्हणाले निवडणुका तर सद्दाम हुसेन आणि गडाफीही जिंकत होते


सातत्याने निवडणुका हारत असताना आत्मचिंतन करण्यापेक्षा आता राहूल गांधी यांनी भारतीय लोकशाही व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. इराणचे हुकूमशहा सद्दाम हुसेन आणि लिबियाचे मुअम्मर गडाफीही निवडणुका जिंकत होते. परंतु, मतांच्या सुरक्षेबाबत कोणतीही संस्थात्मक चौकट नव्हती, असे त्यांनी म्हटले आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : सातत्याने निवडणुका हारत असताना आत्मचिंतन करण्यापेक्षा आता राहूल गांधी यांनी भारतीय लोकशाही व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. इराणचे हुकूमशहा सद्दाम हुसेन आणि लिबियाचे मुअम्मर गडाफीही निवडणुका जिंकत होते. परंतु, मतांच्या सुरक्षेबाबत कोणतीही संस्थात्मक चौकट नव्हती, असे त्यांनी म्हटले आहे. Rahul Gandhi’s question mark on India’s democracy, says even Saddam Hussein and Gaddafi were winning elections

अमेरिकेच्या ब्राउन यूनिवर्सिटीचे प्रोफेसर आशुतोष वार्ष्णेय यांच्यासोबत ऑनलाईन चर्चा करताना राहूल गांधी म्हणाले, सद्दाम हुसेन आणि गडाफीही निवडणुका घ्यायचे आणि जिंकायचे. असेही नव्हते की लोक मतदान करत नव्हते. परंतु, सुरक्षित मतदानासाठी संस्थात्मक चौकट नव्हती. निवडणुका म्हणजे केवळ हे नाही की लोकांनी जावे आणि व्होटींग मशीनचे बटन दाबावे.निवडणुका ही एक संस्था आहे. देशाची चौकट कशा पध्दतीने चालविली जाऊ हे निवडणुकांतून ठरते. न्यायपालिका निष्पक्ष असावी आणि संसदेमध्ये चर्चा व्हावी हे मतदानाचे लक्ष्य आहे.
फ्रीडम हाऊस आणि वी डेम इन्स्टिट्यूट या परदेशी संस्थांनी भारतातील स्वतंत्रता आणि लोकशाहीच्या अवस्थेबाबत केलेल्या टीकेबाबत राहूल गांधी म्हणाले, या संस्थांच्या पुराव्याची आम्हाला गरज नाही. या परदेशी संस्था आहेत. परंतु, येथील परिस्थिती त्यापेक्षाही खराब आहे. जर कोणी फेसबुक आणि व्हॉटसअ‍ॅपला नियंत्रित करू लागले तर लोकशाहीच नष्ट होऊ शकते.

पक्षांतर्गत लोकशाहीची गरज व्यक्त करताना राहूल गांधी म्हणाले की मी कधीही म्हणालो नाही की कॉँग्रेसमध्ये निवडणुका होऊ नयेत. एका भाजपाच्या खासदाराचा संदर्भ देत राहूल गांधी म्हणाले त्यांनी मला सांगितले की लोकसभेत कधीही खुल्या पध्दतीने चर्चा करून दिली जात नाही. त्यांना जे सांगितले जाते तेच बोलावे लागेत.

गांधी म्हणाले, देशात नोकरीच्या समस्येने विक्राळ रुप धारण केले आहे. जर ही समस्या सुटली नाही तर भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनच्य आव्हानाचा मुकाबला करता येणार नाही. लाखो लोक गावातून शहरांकडे येत असतात. त्यांच्यासाठी आपण काहीतरी करण्याची गरज आहे. त्यांना नवा दृष्टीकोन द्यायला हवा. कृषि आणि निर्मिती क्षेत्रांत त्यासाठी सुधारणा कराव्या लागतील.

कॉँग्रेसच्या नेतृत्वावरून राहूल गांधी यांनी दूर व्हावे अशी मागणी काही नेत्यांनी केली आहे या प्रश्नावर ते म्हणाले, कॉँग्रेसमधील काही तत्वांचे आणि मूल्यांचे रक्षण मी करत आहे. कोणाला तरी हे आवडत नाही म्हणून मी माझा संघर्ष सोडणार नाही. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंंसेवक संघाशी आपला लढा सुरूच ठेवणार आहोत. माझे नाव काय आहे, माझे वडील, आजोबा कोण होते याच्याशी मला देणेघेणे नाही. मला पक्षातील मूल्यांचे रक्षण करायचे आहे. कोणाला ते आवडो अथवा नको मी ते करत राहणार आहे. गांधी परिवारातील कोणीही १९८९ पासून पंतप्रधान झाले नाही. मात्र, काही लोकांना उगाच वाटत असते की आम्हीच सत्तेवर आहोत. माझी कॉँग्रेसमध्ये भूमिका आहे. मी कोणाचा तरी नातू किंवा मुलगा आहे म्हणून नव्हे तर कॉँग्रेसच्या विचारधारेचे रक्षण करण्यासाठी माझा संघर्ष आहे.

Rahul Gandhi's tongue slipped again, saying- India is no longer a democratic country, gives Sweden's report

Rahul Gandhi’s tongue slipped again, saying- India is no longer a democratic country, gives Sweden’s report

Rahul Gandhi’s question mark on India’s democracy, says even Saddam Hussein and Gaddafi were winning elections

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था