राहुल गांधींपासून अधीररंजन चौधरींपर्यंत सर्वांकडून कॉंग्रेसला फुटकळ निधी

पतनाकडे वाटचाल सुरू असलेल्या कॉंग्रेसला ऐन निवडणुकीच्या काळात २०१९-२० मध्ये निवडणूक निधी देण्यात जनतेने आखडता हात घेतला. परंतु, ज्या पक्षाच्या बळावर संपूर्ण कारकिर्द घडली तो पक्ष अडचणीत असताना कॉंग्रेस नेतेसुद्धा पुढे आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.Rahul Gandhi to Adhir Ranjan Chaudhary, petty funds to the Congress


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पतनाकडे वाटचाल सुरू असलेल्या कॉंग्रेसला ऐन निवडणुकीच्या काळात २०१९-२० मध्ये निवडणूक निधी देण्यात जनतेने आखडता हात घेतला आहे. या वर्षी कॉंग्रेसला केवळ १३९ कोटी रुपयांचा निधी मिळाला. यात कॉंग्रेस नेत्यांनीही कद्रुपणा केल्याचे स्पष्ट झाले आहे.

राहुल गांधींपासून ते लोकसभेतील नेते अधीररंजन चौधरींपर्यंत अनेकांनी केवळ ५४ हजार रुपयांचा वैयक्तिक निधी पक्षाला दिला आहे. भारतीय निवडणूक आयोगाने कॉंग्रेसकडून निवडणूक निधीबाबत मिळालेला अहवाल प्रसिध्द केला आहे.

कायद्यानुसार व्यक्ती, संस्था, कंपन्या आणि इलेक्ट्रोरल ट्रस्ट आणि संघटनांकडून २० हजार रुपयांपेक्षा जास्त निधी मिळाल्यास त्याची माहिती देणे बंधनकारक आहे. कॉंग्रेसची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याचे यातून दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या वर्षातही कॉंग्रेसला जनतेने निधी दिला नाही. २०१८-२९ मध्ये कॉंग्रेसला १४६ कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. परंतु, पुढच्या वर्षी निवडणुका असूनही कॉंग्रेसची सत्तेवर येण्याची शक्यता धुसर झाल्याने निधी देणाऱ्यांनी हात आखडता घेतला.मुळात कॉंग्रेसची हायकमांड म्हणविल्या जाणाऱ्या गांधी कुटुंबियांनीही या वर्षात नाममात्रच निधी दिला आहे. हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ५० हजार रुपये, त्यांचे पुत्र आणि माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी ५४ हजार रुपये निधी पक्षाला दिला. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून पक्षाचे नेते आनंद शर्मा, शशी थरूर आणि गुलाम नबी आझाद, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी संरक्षण मंत्री ऐ. के. अँटनी, कै. मोतीलाल व्होरा, अहमद पटेल, माजी केंद्रीय मंत्री परनीत कौर आणि लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनीही ५४ हजार रुपये दिले आहेत. मिलींद देवरा यांनी एक लाख रुपये तर राज बब्बर यांनी एक लाख आठ हजार रुपये निधी दिला आहे. सर्वाधिक तीन कोटी रुपयांचा निधी वरिष्ठ नेते कपील सिब्बल यांनी पक्षाला दिला आहे.

टाटा समुहाच्या प्रूडेंट इलेक्ट्रोरल ट्रस्टने ३१ कोटी रुपयांचा आणि आईटीसीने १३ कोटी आणि आईटीसी इन्फोटेकने ४ कोटी रुपये दिल्याने कॉंग्रेस निधीचा १०० कोटी आकडा पार करू शकला आहे.

Rahul Gandhi to Adhir Ranjan Chaudhary, petty funds to the Congress

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*