Rahul Gandhi Takes a dig at Modi government on budget

अर्थसंकल्पावरून राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, संरक्षणातील तरतुदींकडे डोळेझाक

कॉंग्रेस खासदार राहुल गांधींनी महागाईवरून केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावरील भार वाढला आहे. राहुल गांधी यांनी यासाठी केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. त्यांनी एक बातमी शेअर केली आणि ट्विट केले की, मोदी सरकारने अर्थसंकल्प – देश आणि घर या दोन्हींचे बजेट बिघडवले. Rahul Gandhi Takes a dig at Modi government on budget, petrol-diesel, gas price hike


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कॉंग्रेस खासदार राहुल गांधींनी महागाईवरून केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावरील भार वाढला आहे. राहुल गांधी यांनी यासाठी केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. त्यांनी एक बातमी शेअर केली आणि ट्विट केले की, मोदी सरकारने अर्थसंकल्प – देश आणि घर या दोन्हींचे बजेट बिघडवले.

अर्थसंकल्पावरून राहुल गांधींचे मोदी सरकारवर सातत्याने हल्ले सुरू आहेत. शुक्रवारी ते म्हणाले की, मोदींच्या ‘मित्र’ केंद्रित अर्थसंकल्पात – शेतकऱ्यांना पेट्रोल-डिझेलचे जास्त दाम द्यावे लागतील. कोणतीही आर्थिक मदत मिळणार नाही. तीन कृषी कायद्यांनी चिरडल्यानंतर देशाच्या अन्नदात्यावर आणखी एक वार!ट्वीटच्या मालिकेत कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, मोदींचा ‘मित्र’ केंद्रित अर्थसंकल्प म्हणजे – विचित्र परिस्थितीत चीनशी लढा देणाऱ्या सैनिकांना कोणतीही मदत नाही. देशाचे रक्षण करणाऱ्यांचा विश्वासघात!

राहुल गांधींची सोयीस्करपणे डोळेझाक

खरे तर, यावर्षी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात संरक्षणासाठी तब्बल 4 लाख 78 हजार 196 रुपयांची तरतूद केली आहे. अर्थमंत्र्यांनी भाषणात संरक्षण क्षेत्राचा उल्लेखही केला नाही, असे म्हणणाऱ्या राहुल गांधींनी सोयीस्करपणे डोळेझाक करून केंद्रावर टीका केल्याचे दिसून येते. केंद्र सरकारने या आधीच संरक्षण क्षेत्रात 74 टक्के थेट परकीय गुंतवणुकीला मुभा दिलेली आहे. संरक्षण दले, संरक्षण सामग्रीच्या अद्ययावतीकरणावर आत्मनिर्भर भारताची 130 अब्ज डॉलर खर्चाची योजना आहे. याची अंमलबजावणी येत्या काही वर्षांमध्ये होईल. परकीय गुंतवणूकदारांसाठीही ही संधी आहे. दुसरीकडे, भारतीय कंपन्यांसाठी उत्पादनाची आणि निर्यातीचे नवे विक्रम प्रस्थापित करण्याची सुवर्णसंधी आहे.

आता तर 100 टक्के परकीय गुंतवणुकीला सरकारी परवानगीने मुभा देण्यात येणार आहे. एअरो शोमध्ये सहभागी झालेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 80 कंपन्या भारतात संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे मार्ग शोधण्याच्या हेतूनेच सहभागी झाल्या होत्या.

त्याच भव्यदिव्य कार्यक्रमात संरक्षण मंत्रालयाची 89 तेजस विमानांच्या उत्पादनाची तब्बल 48 हजार कोटींची ऑर्डर हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडला प्रदान करण्यात आली. राहुल गांधींनी याकडेही कानाडोळा करून जवानांची फसवणूक झाल्याचे दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे.

Rahul Gandhi Takes a dig at Modi government on budget

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*