राहुल गांधींना धक्काबुक्की नाही, तोल जाऊन पडले, रावसाहेब दानवे यांचा दावा

कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधींना कोणीही धक्काबुक्की केली नाही. गर्दीतून चालत जात असताना त्यांचा तोल जाऊन ते पडले असावेत. एवढ्या मोठ्या नेत्याला धक्काबुक्की कोणीही करू शकत नाही. आम्हीही अनेकदा अशा गर्दीत जातो. लोकांच्या गर्दीमुळे तोल जाऊ शकतो अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधींना कोणीही धक्काबुक्की केली नाही. गर्दीतून चालत जात असताना त्यांचा तोल जाऊन ते पडले असावे. एवढ्या मोठ्या नेत्याला धक्काबुक्की कोणीही करू शकत नाही. आम्हीही अनेकदा अशा गर्दीत जातो. लोकांच्या गर्दीमुळे तोल जाऊ शकतो अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली आहे.

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी राहुल गांधी निघाले होते. त्यावेळी उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप कॉंग्रेसकडून होत आहे.

हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेलेल्या राहुल आणि प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवून धक्काबुक्की केली असे सांगत आता कॉंग्रेसने आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये मूळ हाथरस येथील पीडितेवरील अत्याचाराचा मुद्दा मागे पडला असून गांधींना का धक्काबुक्की केली, यावरच कॉंग्रेसने सगळा भर दिला आहे.

उत्तर प्रदेश सरकारच्या या कथित दडपशाहीविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने मंत्रालयाशेजारच्या गांधी पुतळ्यासमोर आंदोलन केले.
दानवे यांनी म्हटले आहे की, धक्काबुक्कीचा प्रकारच घडलेला नसावा. याबाबत काही माध्यमांकडून चुकीच्या बातम्या पसरविल्या जात आहेत. मात्र, लोकांना माहित असायला हवे की राहुल गांधी यांना सरकारी सुरक्षा आहे. त्यामुळे त्यांच्याशी धक्काबुक्की होऊ शकत नाही.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*