जबरदस्त…तडाखेबंद… राहुलजींचा जावईशोध! हुकूमशहांची नावे ‘M’ अक्षराने सुरू होतात!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जबरदस्त… तडाखेबंद… राहुलजींनी जावईशोध लावलाय… जगभरातील हुकूमशहांची नावे “M” अद्याक्षराने सुरू होतात!!

काँग्रेसचे माजी अध्यक्ष वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. मोदींना हुकुमशहा संबोधताना त्यांनी जगभरातील इतर काही हुकुमशहांची नावे ट्विट जाहीर करून ती कशी ‘M’ या अद्याक्षराने सुरू होतात, असा जावईशोध लावला आहे… वर मोदींना उद्देशून प्रश्नही त्यांनी विचारला आहे.Rahul Gandhi questions PM narendra modi

राहुल गांधी ट्विटमध्ये म्हणतात, की Marcos (मार्कोस), Mussolini (मुसोलिनी), Milošević (मिलोसेविक), Mubarak (मुबारक), Mobutu (मोबुतू), Musharraf (मुशर्रफ), Micombero (मायकोंबेरो) एवढ्या सगळ्या हुकुमशहांची नावं ‘M’ नेच का सुरु होतात? असा रोकडा सवाल करून राहुलजींनी मोदींना पेचात पकडले आहे.

राहुलजींनी उल्लेख केलेले हे हुकमशहा हे खालील देशांचे होते

फर्डिनांद मार्कोस (फिलिपाइन्स), बेनिटो मुसोलिनी (इटली), स्लोबोडन मिलोसेविक (युगास्लाव्हिया), होन्सी मुबारक (इजिप्त), मोबुतो सेसे सेको (कांगो), परवेझ मुशर्रफ (पाकिस्तान), मायकल मायकेंबेरो (बुरुंडी).

Rahul Gandhi questions PM narendra modi

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*