प्रतिनिधी
गुवाहटी – आसाम विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जोराहट येथे आयोजित सभेत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आसाममध्ये कॉंग्रेसचे सरकार स्थापन झाले तर पाच लाख रोजगारांची निर्मिती केली जाईल आणि सरकारी भरती मोठ्या प्रमाणात सुरू केली जाईल, असे आश्वारसन दिले.Rahul Gandhi lashes on PM Modi and bjp
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ देशातील दोन-तीन उद्योगपतींच्या फायद्यासाठी काम करत आहेत. लहान व्यापारी, शेतकरी आणि मजुरांसाठी सरकार काहीच काम करत नाही, अशी टीकाही गांधी यांनी केली. गांधी म्हणाले, की केंद्र सरकारकडून सातत्याने गॅसचे भाव वाढवले जात आहे.
या माध्यमातून आपल्या खिशातील पैसा हा दोन-तीन उद्योगपतींना देण्याचे काम केले जात आहे. नोटाबंदी आणि जीएसटीचा उल्लेख करताना ते म्हणाले, की काळ्या पैशाचे काही झाले नाही मात्र आसामची प्लायवूड इंडस्ट्री बंद पडली.
आम्ही पाच गोष्टी देण्याचे वचन दिले आहे. पहिले म्हणजे सीएए कायदा आसाम किंवा देशात लागू होऊ देणार नाही, आम्ही चहामळ्यात काम करणाऱ्या मजुरांना ३६५ रुपये मजुरी देणार, राज्यातील सर्व कुटुंबांना २०० युनिट मोफत वीज देणार, महिलांना दरमहा २००० रुपये देणार आणि राज्यात पाच लाख रोजगारांची निर्मिती करणार. राज्यात मोठ्या प्रमाणात सरकारी खात्यात भरती सुरू केली जाईल. उद्योगामार्फत लाखो लोकांना रोजगार दिला जाईल, असेही आश्वा्सन त्यांनी दिले.