राहुल गांधी सेलीब्रेशन रद्द करत नाही आणि तुम्ही प्रजासत्ताक दिन परेड रद्द करण्याची मागणी करता, संबित पात्रा यांची कॉंग्रेसवर टीका

काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी दिल्लीतील राजपथावरील प्रजासत्ताक दिन परेड रद्द करण्याची मागणी केली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये कोणतेही प्रमुख पाहुणे सहभागी होणार नसल्याने संपूर्ण कार्यक्रम रद्द का करू नये, असं काँग्रेस नेते शशी थरूर म्हणाले. त्यांच्या टिप्पणीवर भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी कडक शब्दांत टीका केली आहे. कॉंग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर नेम साधला. राहुल गांधींनी आपलं सेलिब्रेशन रद्द केलं का, असा सवाल पात्रा यांनी केला आहे. Rahul Gandhi does not cancel celebrations and you demand cancellation of Republic Day Parade, Sambit Patra criticizes Congress


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी दिल्लीतील राजपथावरील प्रजासत्ताक दिनाची परेड करण्याची मागणी केली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये कोणतेही प्रमुख पाहुणे सहभागी होणार नसल्याने संपूर्ण कार्यक्रम रद्द का करू नये, असं काँग्रेस नेते शशी थरूर म्हणाले. त्यांच्या टिप्पणीवर भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी कडक शब्दांत टीका केली आहे. कॉंग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर त्यांनी नेम साधला. राहुल गांधींनी आपलं सेलिब्रेशन रद्द केलं नाही आणि परेड रद्द करण्याची काय मागणी करता, असा सवाल पात्रा यांनी केला आहे.दरवर्षी प्रजासत्ताक दिनाला म्हणजे २६ जानेवारीला राजधानी दिल्लीत राजपथावर भारत आपली संस्कृती आणि पराक्रमाचे प्रदर्शन करतो. दरवर्षी या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून एका विदेशी राष्ट्राध्यक्षला आमंत्रित केलं जातं. या वर्षी प्रमुख पाहुणे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन होते. पण ब्रिटनमधील कोरोना व्हायरसच्या नव्या लाटेमुळे त्यांनी आपला भारत दौरा रद्द केला आहे. दिल्लीतील राजपथावरील प्रजासत्ताक दिनाच्या परेडला प्रमुख पाहुणे येणार नसल्याने आता संपूर्ण कार्यक्रम रद्द करावा, अशी मागणी काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी केली. थरूर यांनी यासंदर्भात ट्वीट केलं.

Rahul Gandhi does not cancel celebrations and you demand cancellation of Republic Day Parade, Sambit Patra criticizes Congress

थरूर यांच्या या ट्विटवर भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी टीका केली आहे. पात्रा यांनी या चर्चेत राहुल गांधींना खेचत कॉंग्रेसवरही हल्ला चढवला. प्रजासत्ताक दिनाची परेड हा काही सामान्य ‘उत्सव’ नाही की जो रद्द करावा. याशिवाय राहुल गांधींनी आपलं सेलिब्रेशन रद्द केलेलं नाही. त्यांचं दूरच्या ठिकाणी जाणं सुरूच आहे. तरीही प्रजासत्ताक दिनाची परेड रद्द करण्याची मागणी कॉंग्रेस करते.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*