विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – अशोका विद्यापीठातील प्राध्यापक आणि राजकीय टीकाकार प्रताप भानू मेहता आणि प्रा. अरविंद सुब्रह्मण्यम यांनी दिलेला राजीनामा हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मोठा धक्का असून त्याच्याशी तडजोड करून अशोक विद्यापीठाच्या संस्थापकांनी त्यांचा आत्मा गमावला आहे, अशी टीका प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ रघुराम राजन यांनी केली आहे. Raghuram Rajan wrote letter regarding mehata, subramanayam resignation
राजन यांनी लिंक्डइनवर तीन पानी पत्रच लिहले असून आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. राजन म्हणतात, सुब्रह्मण्यम आणि मेहता यांच्या राजीनामापत्रातून असे दिसते की, त्रासदायक टीकेपासून मुक्त होण्यासाठी विद्यापीठाचे संस्थापक बाहेरील दबावाला बळी पडले आहे. मेहता शिक्षण क्षेत्रातील खरे विद्वान असल्याने ते सरकार आणि विरोधकांवरही समान टीका करीत. यामुळे विद्यापीठाच्या प्रशासनात ते काटा समजले जात असत.
मात्र या पुढेही भारतातील उदारमतवादी विद्वान नेते ही त्यांची ओळख कायम राहील. विद्यापीठाने केलेली तडतोड ही विद्यापीठाच्या हिताची आहे, असे जर संस्थापकांना वाटत असेल तर ते चुकीचे आहे. कोणत्याही मोठ्या विद्यापीठासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र हा आत्मा असतो. त्याविषयी तडजोड करून संस्थापकांनी त्यांचा आत्मा गमावला आहे आणि जर तसे करण्याची तुमची तयारी असेल तर दबाव नाहीसा होऊ शकतो का?.
दरम्यान, प्रा. मेहतांच्या समर्थनार्थ कोलंबिया, येल, हार्वर्ड, प्रिन्सटन, ऑक्सफोर्ड आणि केंब्रिज यासह आंतरराष्ट्रीय विद्यापीठांतील १५० हून अधिक शिक्षणतज्ज्ञ पुढे आले आहेत. अशोका विद्यापीठाचे प्रशासन, प्राध्या्पक, कर्मचारी आदींना उद्देशून त्यांनी पत्र लिहिले आहे.