पुतीन हे खुनी… अमेरिकेच्या निवडणुकीत ढवळढवळ केल्याची किंंमत त्यांना चुकवावी लागणयाचा बायडेन यांचा इशारा

रशियाचे अध्यक्ष वाल्दिमिर पुतीन यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ढवळाढवळ करण्याची किंमत चुकवावी लागेल असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिला आहे. हे लवकरच होणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. Putin will pay a price for election meddling, Biden cautioned


विशेष प्रतिनिधी

न्यूयॉर्क : रशियाचे अध्यक्ष वाल्दिमिर पुतीन यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ढवळाढवळ करण्याची किंमत चुकवावी लागेल असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिला आहे. हे लवकरच होणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या २०२० च्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रंप यांच्या बाजुने जनमत वळविण्यासाठी रशियाचे अध्यक्ष वाल्दिमिर पुतीन यांनी प्रयत्न केले होते. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बायडेन म्हणाले, त्यांना किंमत नक्कीच चुकवावी लागेल. तुम्ही लवकरच ते पाहाल. मात्र, हे कशा पध्दतीने होईल हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाने ढवळाढवळ केल्याचे पुरावे मिळाल्याचे अमेरिकन गुप्तचर संस्थांनी आपल्या अहवालात म्हटले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियातून फेसबुक आणि इतर समाजमाध्यमांतून डोनाल्ड ट्रंप यांच्या बाजुने प्रचार केला होता.

पुतीन यांच्यावर टीका करताना बायडेन म्हणाले एखाद्या नेत्याला पूर्णपणे समजून घेणे गरजेचे असते. पुतीन हे खुनी आहेत असे आपल्याला वाटते असे सांगून ते म्हणाले त्यांना ह्रदयच नाही.
बायडेन यांनी पुतीन यांच्यासोबत चर्चेची शक्यता असल्याचेही म्हटले असून परस्परांच्या हितासाठी काम करता येईल असे सांगितले आहे. पुन्हा एकदा आण्विक करार केला जाऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.

Putin will pay a price for election meddling, Biden cautioned

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*