कोरोनाविरोधी लसीच्या वितरणाचेपुणे देशातील प्रमुख केंद्र; विमानातून होणार वाहतूक

पुण्यातील सीरम इंस्टिट्यूटने कोव्हिशिल्ड ही लस तयार केली आहे. या लशीच्या आपत्कालीन वापरास आणि उत्पादनास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. Pune is a major center for the distribution of anti-corona vaccines in the country


विशेष प्रतिनिधी

पुणे : कोरोनाविरोधी लसीच्या वितरणाचे पुणे हे देशातील प्रमुख केंद्र बनणार आहे. पुण्यातून देशभरात लस विमानाने पाठविली जाणार आहे.

पुण्यातील सीरम इंस्टिट्यूटने कोव्हिशिल्ड ही लस तयार केली आहे. या लशीच्या आपत्कालीन वापरास आणि उत्पादनास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. विविध राज्यात लस हवाई मार्गाने पाठविण्यासाठी 8 किंवा 9 जानेवारीपासून सुरुवात होत आहे.त्यासाठी प्रवासी विमानाचा वापर करण्यास परवानगी दिली आहे.पुण्याचे विमानतळ हवाई दलाच्या ताब्यात असल्याने ते सहकार्य करणार आहेत. 41 विमानतळाचा वापर लस वाहतुकीसाठी केला जाणार आहे. दिल्ली, कर्नाल, कोलकत्ता, गुवाहाटी, चेन्नई, हैदराबाद ही मिनी हब विमानतळे म्हणून निवडली आहेत. त्यातून लस अन्यत्र वितरित होईल.

Pune is a major center for the distribution of anti-corona vaccines in the country

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*