पुलवामाचे पाप आमचेच, पाकच्या मंत्र्यांनीच दिलेल्या कबुलीनंतर शंका व्यक्त करणाऱ्यांचे दात घशात


जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे ४० जवानांना शहीद करणारा हल्ला घडविल्याचे पाप आमचेच असल्याची कबुली पाकिस्तानच्या मंत्र्याने दिली आहे. पुलवामा हल्यावरून शंका-कुशंका व्यक्त करणाऱ्यांना यामुळे चांगलीच थप्पड बसली आहे. (pulwama attack)


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे ४० जवानांना शहीद करणारा हल्ला घडविल्याचे पाप आमचेच असल्याची कबुली पाकिस्तानच्या मंत्र्याने दिली आहे. पुलवामा हल्यावरून शंका-कुशंका व्यक्त करणाऱ्यांना यामुळे चांगलीच थप्पड बसली आहे.

निवडणुकीच्या तोंडावर पुलवामा हल्ला झाल्याने याबाबत वेगवेगळ्या शंका व्यक्त करून अनेकांनी हुतात्मा जवानांनी सांडलेल्या रक्ताचा अवमान केला. मात्र, आता पाकिस्तानच्या संसदेतच पाक मंत्री फवाद चौधरी यांनी हा दहशतवादी हल्ला पाकनेच घडवल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे या हल्ल्याबद्दल संशय व्यक्त करणाऱ्या कॉंग्रेसपासून मनसेपर्यंतच्या सर्वांचे दात घशात गेल्याचे बोलले जात आहे.

भारताने बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी आणि लष्करप्रमुख बाजवा यांना घाम फुटला होता आणि त्यांचे पाय थरथरत होते, असा गौप्यस्फोट पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य अयाझ सादिक यांनी केला. त्यांना उत्तर देताना फवाद चौधरींनी पुलवामा हल्ला हे इम्रान खान सरकारचे यश असल्याचे म्हटले आहे.

सादिक यांनी ही माहिती पाकिस्तानच्या असेंब्लीमध्येच दिली आहे. भारताकडून हल्ला होईल या भीतीनं विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना सोडण्यात आलं, असंही सादिक यांनी सांगितलं. अभिनंदन यांना सोडण्यापूर्वी झालेल्या बैठकीत पंतप्रधान इम्रान खान यांनी हजर राहणं टाळलं. पण या बैठकीत उपस्थित असलेले परराष्ट्र मंत्री आणि लष्करप्रमुख या दोघांचाही कसा थरकाप उडाला होता, याचं वर्णन सादिक यांनी नॅशनल असेंब्लीतील भाषणात केलं.

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी मागील वर्षी 27 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानी एफ-16 फायटर जेटला नेस्तनाबूत केलं होतं. मात्र त्यानंतर त्यांचं विमान देखील क्रॅश झालं आणि ते पीओकेमध्ये पडलं होतं. या मुद्द्यावरुन पाकीस्तानात अजूनही राजकारण सुरु आहे.

pulwama attack

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी मागील वर्षी 27 फेब्रुवारी 2019 रोजी पाकिस्तानी एफ-16 फायटर जेटला नेस्तनाबूत केलं होतं. मात्र त्यानंतर त्यांचं विमान देखील क्रॅश झालं आणि ते पीओकेमध्ये पडलं होतं. त्यावेळी पाकिस्तानी सैन्याने अभिनंदन यांना ताब्यात घेतलं होतं. तिथं विमान कोसळल्यानंतर विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानात असल्याचा भास झाला. त्यावेळी त्यांनी त्यांच्याजवळील काही महत्वाची कागदपत्रं तलावात फेकली तर काही कागद चावून खाऊन टाकले होते.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था