म्यानमारमध्ये अनेक शहरांमध्ये निदर्शनांचे लोण वाढले, परिस्थिती चिघळण्याची शक्यता

वृत्तसंस्था

यंगून : म्यानमारमध्ये यंगून आणि देशाची राजधानी न्यापिताव येथे नागरिकांनी सुरु केलेल्या आंदोलनाचे लोण आता देशभर पसरले आहे. रंगून आणि न्यापितावमध्ये काल मोठी निदर्शने झाली होती. आज या दोन शहरांबरोबरच इतरही अनेक शहरांमध्ये नागरिकांनी निदर्शने केली. आंदोलक अथवा सरकार कोणीही माघार घ्यायला तयार नसल्याने परिस्थिती चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. Protests erupted in several cities in Myanmar, likely to worsen the situation

लष्कराने सत्ता सोडून लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारकडे सत्ता सोपवावी आणि नेत्या आँग सान स्यू की यांची मुक्तता करावी, अशी मागणी निदर्शक करत आहेत. म्यानमारच्या थायलंडला लागून असलेल्या सीमेजवळील म्यावडी गावात नागरिकांनी मोठा मोर्चा काढला होता.या मोर्चाला पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला, तसेच पाण्याच्या फवाऱ्याचाही मारा केला. पोलिसांची गोळी लागून एक महिला जखमी झाल्याचेही वृत्त आहे. आज देशातील काचिन, मोन, शान या राज्यांमधील काही शहरांमध्ये नागरिकांनी लष्करी राजवटीविरोधात निदर्शने केली. राजधानी न्यापितावमध्ये आंदोलनाला मिळणारा पाठिंबा आश्च र्यचकीत करणारा आहे. या शहरातील बहुतांश लोकसंख्या सरकारी अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय आहेत. आधीच्या लष्करी राजवटीत हे शहर हेतूपूर्वक उभारण्यात आले होते. त्यामुळे येथे लष्कराचीही उपस्थिती मोठ्या प्रमाणात असते.

Protests erupted in several cities in Myanmar, likely to worsen the situation

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*