पाकिस्तानमधून 300 ट्विटर हँडल्सची निर्मिती ; सातत्याने Farmer Protest, Tractor Rally चा हॅशटॅग दिल्ली पोलीसांची माहिती


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीच्या सीमवेर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनास 50 दिवस केव्हाच उलटून गेले. केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकरी यांच्या चर्चेच्या 12 फेऱ्या होऊनही तोडगा निगाला नाही. शेतकरर्यांनी आज प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्ली येथे ट्रॅक्टर मोर्चा काढला .हा मोर्चा हायजॅक करण्यासाठी आणि मोर्चात गोंधळ घालण्यासाठी पाकिस्तानमधून सुमारे 300 ट्विटर हॅण्डल्स बनविण्यात आल्याची माहिती आहे, असा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. पोलीस आयुक्त दीपेंद्र पाठक यांनी ही माहिती दिली आहे.Production of 300 Twitter handles from Pakistan Tractor Rally Hashtag Delhi Police Information

दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे की, पाकिस्तानातून तयार करण्यात आलेली 300 ट्विटर हँण्डल्स ही साधारण 13 ते 18 जानेवारी या कालावधीत तयार करण्यात आली आहेत. ट्रॅक्टर्स रॅली हे आमच्यासाठीही एक मोठे आव्हान आहे.दिल्ली पोलिसांनी पुढे म्हटले आहे की, पाकिस्तानातून दहशतवादी काहीतरी मोठा अडथळा किंवा समस्या निर्माण करु शकतात. ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. पाकिस्तानातील सुमारे 308 ट्विटर हँडल्स ही सातत्याने Farmer Protest, Tractor Rally याबाबतचा हॅशटॅग वापरताना आढळून येत आहेत.

एकीकडे शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागले असतांना पाकिस्तानची नजर आंदोलनाला असल्याचे खळबळजनक वृत दिल्ली पोलीसांनीदिले आहे.

Production of 300 Twitter handles from Pakistan Tractor Rally Hashtag Delhi Police Information

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था