दोन आयुक्त करून मुंबईकरांचे प्रश्न सुटणार असतील तर राज्यात दहा मुख्यमंत्री करा, सुधीर मुनगंटीवार यांची टीका


मुंबईत दोन आयुक्त करून प्रश्न सुटणार आहेत का? मुंबईकरांचे प्रश्न सुटले पाहिजेत. दोन आयुक्त केल्याने प्रश्न सुटत असतील तर मग राज्यात दहा मुख्यमंत्री करायला पाहिजे, अशी माजी मंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री अस्लम शेख यांच्यावर केली आहे. problems of Mumbaikars are going to be solved by two commissioners


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईत दोन आयुक्त करून प्रश्न सुटणार आहेत का? मुंबईकरांचे प्रश्न सुटले पाहिजेत. दोन आयुक्त केल्याने प्रश्न सुटत असतील तर मग राज्यात दहा मुख्यमंत्री करायला पाहिजेत, अशी टीका भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री अस्लम शेख यांच्यावर केली आहे. problems of Mumbaikars are going to be solved by two commissioners

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा होणारा विस्तार व वाढणारी लोकसंख्या पाहता बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी दोन आयुक्त असणं गरजेचे आहे, अशी मागणी मंत्री अस्लम शेख यांनी नगर विकास विभागाकडे केली आहे. यावर मुनगंटीवार यांनी टीका केली आहे.


ग्रामपंचायत निवडणुकांत महाविकास आघाडीला जागा दाखवून देऊ, आशिष शेलार यांचा इशारा


मुनगंटीवार म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी नामांतराबद्दल भूमिका घेतली, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. नामांतराबद्दल 4 मार्च 2020 रोजी राज्य सरकारने एक प्रस्ताव केंद्र सरकारकडे दिला. त्या प्रस्तावाला काँग्रेसने विरोध केला नाही. बाळासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी नामांतर करण्याची मागणी चंद्रकांत खैरे यांनी केली त्याचे स्वागत करतो. ठाकरे सरकारने 23 जानेवारीला नामांतराची घोषणा करावी.

याबाबत आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, अस्लम शेख यांची मुंबईला दोन आयुक्त देण्याची मागणी करणे अत्यंत निंदनीय असून, या आडून मुंबईचे तुकडे करण्याचे काँग्रेसचे अनेक वर्षांपासूनचे षडयंत्र पुन्हा एकदा उघड झाले आहे. अस्लम शेख मागील 11 वर्षांपासून प्रतिनिधित्व करीत असलेल्या मालाडमधील नागरिकांना महानगरपालिकेच्या संदर्भातील कामे करण्यासाठी होत असलेली अडचण दूर व्हावी याकरता कधीही प्रयत्न करावेसे वाटले नाहीत.

परंतु मी आमदार झाल्यापासून मालाड पूर्व, कुरार गाव, दिंडोशी येथील नागरिकांचे हेलपाटे थांबावे याकरिता वेगळा प्रशासकीय प्रभाग व्हावा यासाठी सतत पाठपुरावा करत होतो, माझ्या मागणीवरून मुंबई मनपाच्या पी/उत्तर वार्ड चे विभाजन करून पी/पूर्व व पी/पश्चिम असे दोन प्रशासकीय प्रभाग करण्याचा निर्णय मुंबई मनपाने घेतला आहे.

problems of Mumbaikars are going to be solved by two commissioners

या पोटशूळातून अस्लम शेख यांनी आता मुंबईसाठी दोन आयुक्त नेमण्याची मागणी केली आहे. याआडून मुंबई तोडण्याचा काँग्रेसचा जो डाव आहे तो भारतीय जनता पक्ष कदापी यशस्वी होऊ देणार नाही. असे करण्याचा कोणताही प्रयत्न झाल्यास मुंबई भारतीय जनता पक्षाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या नावाने कायमच राजकारण करणाऱ्या शिवसेनेची व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अस्म शेख यांच्या या वक्तव्याविषयीची भूमिका काय आहे, असाही सवाल भातखळकर यांनी केला.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती