टूलकिट प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या टीकेला प्रियांका गांधी यांनी काय दिले प्रत्युत्तर?

विशेष प्रतिनिधी

गुवाहटी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टूलकिट प्रकरणी काँग्रेसवर कटाचा आरोप केला होता. प्रियांका गांधी यांनी त्याला आता प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ वर्षीय युवतीच्या ट्विटमुळे दु:खी आहेत.Priyanka Gandhi targets PM Modi in Assam

मात्र, आसाममधील पूरग्रस्त लोकांचे दु:ख त्यांना दिसत नाही, अशा शब्दात काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पंतप्रधानांवर येथे हल्ला चढविला. गेल्या वर्षी ब्रम्हपुत्रेच्या पुरामुळे जवळपास ३० लाख लोक प्रभावित झाले. मी पंतप्रधानांचे भाषण ऐकले. ते आसाममध्ये विकास न झाल्याबद्दल अतिशय वाईट वाटत असल्याचे म्हणाले.



पंतप्रधान २२ वर्षीय युवतीच्या ट्विटबद्दल बोलत असल्याचा मला धक्का बसला, असे त्या दिशा रावीचा उल्लेख न करता प्रियंका म्हणाल्या.पंतप्रधानांच्या आसाममधील दोन इंजिनांच्या सरकारच्या वक्तव्याचीही त्यांनी खिल्ली उडविली.

भाजपशासित आसाममध्ये सध्या दोन मुख्यमंत्री आहेत अशी टीका त्यांनी केली. आसाममधील शक्तीशाली मंत्री हिमंत विश्व शर्मा समांतर सरकार चालवित असल्याचा आरोप होतो. मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि शर्मा यांच्याकडे त्यांचा रोख होता.

Priyanka Gandhi targets PM Modi in Assam

 

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*