भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे खाजगीकरण; दोन अमेरिकन कंपन्या उत्सुक; ९० हजार कोटी रुपये उभे करण्याचा केंद्र सरकारचा मानस

  • ९० हजार कोटी रुपये उभे करण्याचा केंद्र सरकारचा मानस

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: देशात अनेक सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण करण्यात आल्यानंतर आता भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या खासगीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सरकारचा यातून जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा हेतू आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनमधील सरकारच्या ५२.९८ टक्के हिस्स्याच्या विक्रीमधून ९० हजार कोटी रुपये उभे करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.अमेरिकेतील दोन खासगी कंपन्यांनी उत्सुकता दाखवल्यामुळे यातून दुप्पट किंमत मिळण्याची अपेक्षा आहे. Privatization of Bharat Petroleum Corporation

सध्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनला विकत घेण्यासाठी तीन कंपन्या पुढे आल्या आहे. यामध्ये ५२.९८ टक्के हिस्सा विकत घेण्यासाठी खाण क्षेत्रातील दिग्गज कंपनी वेदांता ग्रुपबरोबरच अमेरिकेतील दोन खासगी कंपन्या इक्विटी इनवेस्टर्स फर्म असणाऱ्या अपोलो ग्रोबल मॅनेजमेंट आणि आय स्वेअर्ड कॅपिटल्सची थिंक गॅसने बोली लावली आहे. बीपीसीएलला विकत घेण्यासाठी अमेरिकन कंपन्यांनी रस दाखवल्यामुळे मोठी किंमत मिळण्याची अपेक्षा सरकारला आहे.

सरकारने जो ५२.९८ टक्के वाटा विक्रीसाठी काढला आहे त्यामधून ९० हजार कोटी रुपये उभं करण्याचं लक्ष समोर ठेवलं आहे. यामध्ये बीपीसीएलच्या इतर संपत्तीचाही समावेश आहे. सध्या शेअर बाजारातील कंपनीच्या शेअर्सच्या आधारावर सरकार कंपनीची हिस्सेदारी विकत आहे सा समज असेल तर तो चुकीचा आहे.


आर्थिक चक्र सुरू, इंधनाची मागणी वाढली : धर्मेंद्र प्रधान


सरकार कंपनीच्या मालमत्ता मूल्यांकनाचाही विचार करत आहे.  घडीला कंपनीची किंमत ही ४८ हजार कोटींच्या आसपास असल्याचे समजते. तर आता त्यापेक्षा दुप्पट किंमतीला या कंपनीमधील हिस्सेदारी विकण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

हिंदुस्तान टाइम्सने बीपीसीएलच्या विक्रीशी संबंधित असणाऱ्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, कंपनीच्या खासगीकरणामधून जास्तीत जास्त पैसा उभा करण्यासाठी बीपीसीएलच्या स्टॉक्सची किंमत याच क्षेत्रातील कंपनीच्या विरोधकांच्या शेअर्स इतकी करण्याचा सरकारचा मानस आहे. तर द मिंटच्या वृत्तानुसार सरकारने जो ५२.९८ टक्के वाटा विक्रीसाठी काढला आहे त्यामधून ९० हजार कोटी रुपये उभे करण्याचे लक्ष समोर ठेवले आहे. यामध्ये बीपीसीएलच्या इतर संपत्तीचाही समावेश आहे.

Privatization of Bharat Petroleum Corporation

सध्या शेअर बाजारातील कंपनीच्या शेअर्सच्या आधारावर सरकार कंपनीची हिस्सेदारी विकत आहे असा समज असेल तर तो चुकीचा असून सरकार कंपनीच्या मालमत्ता मूल्यांकनाचाही (Asset Valuation) विचार करत आहे, असं या प्रकरणाशी संबंधित एका तज्ज्ञाने हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना सांगितले आहे. सध्याच्या घडीला कंपनीची किंमत ही ४८ हजार कोटींच्या आसपास असल्याचे समजते.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*