पंतप्रधानांचे प्रधान सल्लागार पी. के. सिन्हा यांचा राजीनामा; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधानांचे प्रधान सल्लागार पी. के. सिन्हा यांनी आज तडकाफडकी पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याचे ठोस कारण समजले नाही.Prime Minister’s Principal Adviser P. K. Sinha Abrupt resignation; The concrete reason is unclear

पंतप्रधान कार्यालयाने सिन्हा यांनी राजीनामा दिल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पण, कारण समजले नसल्याचे सांगितले. सोमवारी (ता.15) त्यांनी पदभार सोडला आहे, अस एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याचा अटीवर सांगितले.सिन्हा यांनी आरोग्याच्या कारणामुळे पदत्याग केल्याचे दुसरा अधिकारी म्हणाला. सिन्हा एक वरिष्ठ आणि जाणकार अधिकारी होते.पण, काही मुद्यावर एवढी मोठी जबाबदारी पेलवणार नसल्याने पदत्याग केला.1977 च्या आयएसएस अधिकारी असलेले सिन्हा उत्तरप्रदेशचे होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीत त्यांनी अनेक पदे भूषविली आहेत. त्यात कॅबिनेट सचिव, त्यापूर्वी वीज आणि नौकायन मंत्रालयात सचिव म्हणून त्यांनी काम केले.

ते 2019 मध्ये निवृत्त झाल्यावर त्यांच्यासाठी विशेष अधिकारी म्हणून नवे पद निर्माण केले होते. न्रीपेंद्र मिश्रा निवृत्त झाल्यावर त्यांच्या जागी पी.के. सिन्हा यांची पंतप्रधानांचे प्रधान सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती.

Prime Minister’s Principal Adviser P. K. Sinha Abrupt resignation; The concrete reason is unclear

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*