पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कोलकत्ता विमानतळावरील फोटो सुपरहिट, २४ तासांत दहा लाखांहून अधिक लाईक्स


नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच कोलकाताला भेट दिली होती. कोलकाता विमानतळावर पोहोचल्यावर त्यांनी ट्विट केलेला फोटो सुपरहिट ठरला आहे. २४ तासांत या फोटोला १० लाखांहून अधिक लाईक्स मिळाले. Prime Minister Narendra Modi’s photo at Kolkata airport a super hit, more than one million likes in 24 hours


वृत्तसंस्था

कोलकाता : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच कोलकाताला भेट दिली होती. कोलकाता विमानतळावर पोहोचल्यावर त्यांनी ट्विट केलेला फोटो सुपरहिट ठरला आहे. २४ तासांत या फोटोला १० लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

पांढरा शुभ्र कुर्ता पायजमा, त्यावर शाल ओढलेली आणि छातीपर्यंत पोहोचत असलेली पांढरी दाढी या वेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी कोलकत्ता विमानतळावर पोहोचले. यावेळी त्यांनी हा फोटो ट्विट करून नेताजी बोस यांना अभिवादन करण्यासाठी कोलकाता येथे पोहोचलो असे म्हटले होते.नेताजींना अभिवादन करण्यासाठी लालबहादूर शास्त्री आणि पी. व्ही. नरसिंह राव यांच्यानंतर आलेले मोदी तिसरे पंतप्रधान आहेत. कॉंग्रेसच्या एकाही पंतप्रधानाने आजपर्यंत नेताजींना अभिवादन करण्यासाठी येथे भेट दिलेली नाही.

पंतप्रधानांनी कोलकाता येथील विक्टोरिया मेमोरियल येथील पराक्रम दिवस समारंभाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. नेताजींवरील कायमस्वरूपी प्रदर्शन व प्रोजेक्शन मॅपिंगचे उद्घाटन त्यांनी केले. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते संस्मरण नाणे आणि टपाल तिकिटाचे अनावरण झाले. अमरा नूतन जोबोनेरी दूत, हा नेताजींच्या जीवन आणि कार्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर झाला.
पंतप्रधानांनी नेताजी सुभाष बोस यांच्या एल्गीन मार्ग येथील घर म्हणजे नेताजी भवनला भेट देऊन नेताजींना अभिवादन केले.

त्यानंतर मोदी यांनी नॅशनल लायब्ररी कोलकाता येथे भेट दिली. याठिकाणी एकविसाव्या शतकात नेताजी सुभाष यांच्या वैचारिक वारशाशी पुनर्भेट, यावरील आंतरराष्ट्रीय परिषद तसेच कलाकार मेळावा आयोजित केला होता. पंतप्रधानांनी यावेळी विक्टोरिया मेमोरियल येथे पराक्रम दिवसाच्या सोहळ्याला उपस्थित राहण्याआधी कलाकार तसेच परिषदेतील सहभागीशी संवाद साधला.

Prime Minister Narendra Modi’s photo at Kolkata airport a super hit, more than one million likes in 24 hours

यावेळी पंतप्रधान म्हणाले की, माता भारतीचा शूर सुपुत्र, ज्याने स्वतंत्र भारताच्या स्वप्नाला नवी दिशा दिली त्याचा आज जन्मदिवस आहे. आजचा दिवस आपण अशा जाणिवेचा दिवस म्हणून साजरा करतो ज्या जाणिवेने गुलामगिरीचा अंधकार दूर करून ‘मी स्वातंत्र्याची भीक मागणार नाही तर ते हिसकावून घेईल’, असे आव्हान जागतिक पातळीवरच्या सर्वात बलशाली शक्तींना दिले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था