चंडीपाठ ह्रदयपरिवर्तनामुळे नव्हे तर पराभवाच्या भीतीने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल

दहा वर्षांच्या तुष्टिकरणानंतर, लोकांवर अनेकदा लाठ्या चालवल्यानंतर दीदी बदलेली दिसत आहे. चंडी पाठ करत आहेत, मंदिरात जात आहेत. पण, हे हृदय परिवर्तन नाही, तर पराभवाची भीती आहे. मी दीदींना सांगू इच्छि तो की, हे सर्व कितीही केले, तरी बंगालची जनता तुम्हा पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर केला. Prime Minister Narendra Modi’s attack on Mamata Banerjee, Chadipath not out of heartache but out of fear of defeat


वृत्तसंस्था

पुरुलिया : दहा वर्षांच्या तुष्टिकरणानंतर, लोकांवर अनेकदा लाठ्या चालवल्यानंतर दीदी बदलेली दिसत आहे. चंडी पाठ करत आहेत, मंदिरात जात आहेत. पण, हे हृदय परिवर्तन नाही, तर पराभवाची भीती आहे. मी दीदींना सांगू इच्छि तो की, हे सर्व कितीही केले, तरी बंगालची जनता तुम्हा पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर केला.

पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी पुरुलियामध्ये रॅली केली. बंगाली भाषेत भाषणाची सुरूवात करत ते म्हणाले की, दीदीला बंगालच्या लोकांच्या हितापेक्षा खेळाची चिंता आहे. पण, यावेळेस बंगालची जतना दीदीच्या विरोधात आहे. दहा वर्षे केलेल्या वाईट कृत्याची शिक्षा लोक दीदीला देणार. ही धरती भगवान राम आणि माता सीतेच्या वनवासाची साक्ष देणार आहे.येथे अजुध्या पर्वत आहे, सीता कुंड आहे. अजुध्या नावाने ग्राम पंचायतपण आहे. असे म्हटले जाते की, जेव्हा माता सीतेला तहान लागली होती, तेव्हा भगवान रामाने जमिनीवर बाण मारुन पाणी काढले होते. विचार करा की, तेव्हा पुरुलियामधील जमिनीत किती पाणी असेल. पण, आज परिस्थिती पहा. माझ्या शेतकरी बांधवांना शेती करण्यासाठीही पाणी नाही. येथील महिलांना लांबून पाणी आणावे लागते.

मोदी म्हणाले, येथे डावे आणि तृणमूलने बाहेरील उद्योगांना येऊ दिले नाही. पाण्याच्या व्यवस्था पहिल्यासारख्या राहिल्या नाही. येथील समस्यांवर लक्ष्य देण्याऐवजी तृणमूल सरकार आपल्याच खेळात मग्न आहे. यांनी पुरुलियाला जलसंकट, पलायन आणि भेदभाव असलेले शासन दिले. यांनी पुरुलियाची ओळख मागास भाग म्हणून केली. या सर्वांचे उत्तर दीदीला द्यावेच लागेल. येणाºया निवडणुकीत जनता यांना सत्तेवरुन उतरवुन त्यांची जागा दाखवून देईल.

Prime Minister Narendra Modi’s attack on Mamata Banerjee, Chadipath not out of heartache but out of fear of defeat

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*