कोरोना काळातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पहिलाच परदेश दौरा,बांगलादेश भेटीला आगळे महत्व

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोविडमुळे लागू केलेल्या लॉकडाउनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पहिला परदेश दौरा बांगलादेशला होणार आहे. २६ मार्चला मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी बांगलादेशला जाणार आहेत. वंगबंधू शेख मुजिबूर रहेमान जन्मशताब्दी कार्यक्रमात ते सहभागी होतील.Prime Minister Narendra Modi will visit Bangaladesh

पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. तेथील बंगाली भाषेची अस्मिता लक्षात घेता पंतप्रधानांच्या या दोऱ्याला वेगळे महत्व असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी ट्विट करून कोविड काळातील मोदींच्या पहिल्या परदेश दौऱ्याची माहिती दिली. परराष्ट्र मंत्रालयाच्या या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ आणि २७ मार्चला बांगलादेशात जातील.

बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त तसेच बांगलादेशचे संस्थापक मानले जाणारे बंगबंधू शेख मुजिबूर रहेमान यांच्या जन्मशताब्दीनिमित्त होणाऱ्या सोहळ्यात ते सहभागी होतील.
या कार्यक्रमामध्ये भारतीय पंतप्रधानांसोबतच नेपाळ, श्रीलंका, भूतान आणि मालदिवचे राष्ट्रप्रमुख अथवा सरकारचे प्रमुख सहभागी होणार आहेत.

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीनांशीही त्यांची चर्चा होणार असून या दौऱ्यामध्ये मोदी ढाक्याबाहेरील मंदिरांनाही भेटी देण्याची शक्यता आहे. यावेळी भारत आणि बांगलादेश दरम्यान तीन करारही होण्याची शक्यता आहे.

Prime Minister Narendra Modi will visit Bangaladesh

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*