ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी एक नंबर, ६ कोटी ७० लाख फॉलोअर्स


अमेरिकन संसद कॅपिटॉल हिलवर ट्रम्प समर्थकांनी हल्ला केल्यानंतर ट्विटरने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट कायमस्वरुपी बंद केले आहे. त्यामुळे आता ट्विटरवर फॉलोअर्सच्या संख्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी नंबर वन बनले आहेत. Prime Minister Narendra Modi is number one on Twitter with 67 million followers


विशेष प्रतिनिधी

मुंबई : अमेरिकन संसद कॅपिटॉल हिलवर ट्रम्प समर्थकांनी हल्ला केल्यानंतर ट्विटरने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट कायमस्वरुपी बंद केले आहे. त्यामुळे आता ट्विटरवर फॉलोअर्सच्या संख्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी नंबर वन बनले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटरवर 64.7 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तर ट्रम्प यांचे 88.7 दशलक्ष फॉलोअर्स होते. मात्र आता ट्रम्प यांचं अकाऊंद बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी हे सर्वात जास्त फॉलोअर्स असणारे सक्रीय राजकारणी बनले आहेत.अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांचे ट्विटरवर 127.9 दक्षलक्ष फॉलोअर्स आहेत, मात्र ते आता राजकाराणात जास्त सक्रीय नाहीत. अमेरिकेचे भावी अध्यक्ष जो बायडन यांचे 23.3 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे सध्या 24.2 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ट्विटरवरील फॉलोअर्सची संख्या 21.2 दशलक्ष आहे.

ट्रम्प समर्थकांनी बुधवारी केलेल्या हिंसाचाराची शिक्षा ट्रम्प यांनाही मिळू लागली आहे. हिंसेनंतर ट्विटरने ट्रम्प यांचं अकाऊंट 12 तासांसाठी ब्लॉक केलं होतं. त्याशिवाय त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन अनेक ट्विट्सही हटवण्यात आले होते. परंतु आता ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट कायमस्वरुपी बंद केलं आहे.

Prime Minister Narendra Modi is number one on Twitter with 67 million followers

ट्विटरसह डोनाल्ड ट्रम्प यांचं फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंटही बंद करण्यात आलं आहे. नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बायडन यांच्या शपथविधीपर्यंत, डोनाल्ड ट्रम्प फेसबुक आणि इन्स्टाग्रामचा वापर करू शकणार नाहीत.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था