पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकप्रिय, दूरदृष्टी असलेले नेते ; न्यायमूर्ती शहा यांची स्तुतीसुमने


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्वाधिक लोकप्रिय आणि दूरदृष्टी असलेले नेते आहेत, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. आर. शहा यांनी त्यांचे कौतुक केले. Prime Minister Narendra Modi is a popular, visionary leader
गुजरात उच्च न्यायालयाचा हिरक महोत्सवी सोहळा पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
शहा म्हणाले, कोरोनाच्या सकंटात देशाला सावरण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी मोठे प्रयत्न केले आहेत. त्याची जगात तोड नाही.गुजरात उच्च न्यायालयाने कधीही लक्ष्मण रेषा ओलांडली नाही. नेहमी न्यायदानाचे काम केले. गुजरात माझी कर्मभूमी असून उच्च न्यायालयात 22 वर्षे वकिली आणि नंतर 14 वर्षे न्यायदानाचे कार्य केले.
ते म्हणाले, गुजरात उच्च न्यायालयाच्या हिरक महोस्तवी सोहळ्यात भाग घेण्याची संधी मिळाली. हे मी माझे भाग्य समजतो.

Prime Minister Narendra Modi is a popular, visionary leader

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था