पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण, भारत बनतोय जगाची फार्मसी, भारतीय कोव्हॅक्सिनसाठी २५ देश रांगेत


कोरोनाच्या संकटात संपूर्ण जगाची मदत करत भारताला जगाची फार्मसी बनविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होऊ लागले आहे. भारतीय बनावटीच्या कोव्हॅक्सिन लसीसाठी २५ देश रांगेत आहेत.Prime minister dream come true India is world pharmacy 25 countries line up for Indian covacin


प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटात संपूर्ण जगाची मदत करत भारताला जगाची फार्मसी बनविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होऊ लागले आहे. भारतीय बनावटीच्या कोव्हॅक्सिन लसीसाठी २५ देश रांगेत आहेत.

भारताने आतापर्यंत 15 देशांना कोरोनाची लस पुरवली आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिली. ते म्हणाले, आणखी 25 देश कोरोना लशीसाठी प्रतीक्षेत आहेत. तिसऱ्या श्रेणीतील देशांना भारताकडून कोरोनाची लस हवी आहे.भारत कोरोनाच्या लशीबाबत जगाच्या नकाशावर अधोरेखित झाला आहे. काही गरीब देशांना अनुदानाच्या आधारावर लस पुरवली जात आहे. तर काही देशांना भारतात दिल्या जाणाऱ्या किंमतीत लस हवी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला जगाच्या फार्मसीच्या स्वरुपात स्थापित करू इच्छित आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितले की, देशात आतापर्यंत 54 लाखांहून अधिक लोकांनी कोरोना – 19 विरोधी लस टोचून घेतली आहे. आतापर्यंत एकूण 54 लाख 16 हजार 849 लाभार्थींना लस टोचण्यात आली आहे.

ज्यात उत्तर प्रदेशातून सर्वाधिक 6 लाख 73 हजार 542 लोकांना लस देण्यात आली असून यानंतर महाराष्ट्रात 4 लाख 34 हजार 943, राजस्थानात 4 लाख 14 हजार 422 आणि कर्नाटकात 3 लाख 60 हजार 592 लोकांना लसीकरण करण्यात आलं आहे.

Prime minister dream come true India is world pharmacy 25 countries line up for Indian covacin

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था