पंतप्रधान करणार बिहार विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये ४ सभा घ्याव्यात अशी विनंती भारतीय जनता पक्षाने केली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान मोदी यांनी बक्सर, जहानाबाद, रोहतास आणि भागलपूर येथे प्रचारसभा घ्याव्यात असा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे.


विशेष वृत्तसंस्था

पाटणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी बिहारमध्ये ४ सभा घ्याव्यात अशी विनंती भारतीय जनता पक्षाने केली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बक्सर, जहानाबाद, रोहतास आणि भागलपूर येथे प्रचारसभा घ्याव्यात असा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे.

बिहार निवडणुकीचा चेहरा असलेले मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली भाजप लढत आहे. तरीही मतदारांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता मोठी आहे हे भारतीय जनता पक्षाला चांगलेच माहीत आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या किमान चार सभा व्हाव्यात असा भाजपाचा प्रयत्न आहे. यामुळेच भारतीय जनता पक्षाने राज्यात एनडीए आघाडीला सोडचिठ्ठी दिलेल्या लोक जनशक्ती पक्षाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो, बॅनर किंवा पोस्टर वापरू नये असे बजावले आहे.

लोक जनशक्ती पक्ष हा केंद्रात नरेंद्र मोदी सरकारसोबत एनडीएत सहभागी आहे. मात्र, बिहार राज्यात जनता दल संयुक्तसोबत वाद झाल्याने पक्षाने आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आपला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास आहे असे लोक जनशक्ती पक्ष सतत बोलत आहे. पक्षाचे नेते चिराग पासवान हे देखील सतत असेच बोलत आहेत. लोक जनशक्ती बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक नाही, त्यामुळे हा पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊ शकत नाही, असे भारतीय जनता पक्षाचे नेते भूपेंद्र यादव यांनी म्हटले आहे.

बिहार विधानसभेच्या एकूण २४३ जागा आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिला टप्प्यातील मतदान २८ ऑक्टोबरला, दुसऱ्या टप्प्यातील मतदान ३ नोव्हेंबरला तर, तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ नोव्हेंबरला होणार आहे. मतमोजणी १० नोव्हेंबरला होईल.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*