मतपेटीवर डोळा ठेऊन अर्थसंकल्पातील घोषणांचा वापर , पंतप्रधानांचा कॉंग्रेसच्या सरकारवर हल्लाबोल

मतपेटीवर डोळा ठेवून यापूर्वीच्या सरकारांनी अर्थसंकल्प मांडला आणि जी आश्वासने पूर्ण करता येऊ शकत नाहीत, त्याबाबतच्या घोषणा करण्यासाठी अर्थसंकल्पाचा वापर केला, मात्र देशाची भूमिका आता बदलली आहे, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.Prime Minister attacks Congress govt using budget keep eye on ballot boxes


प्रतिनिधी

नवी दिल्ली : मतपेटीवर डोळा ठेवून यापूर्वीच्या सरकारांनी अर्थसंकल्प मांडला आणि जी आश्वासने पूर्ण करता येऊ शकत नाहीत त्याबाबतच्या घोषणा करण्यासाठी अर्थसंकल्पाचा वापर केला. मात्र देशाची भूमिका आता बदलली असल्याचा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

पंतप्रधान म्हणाले की, आपल्या देशात गेल्या अनेक दशकांपासून कोणाच्या नावाने कोणत्या घोषणा केल्या जातात इतकाच अर्थसंकल्पाचा मर्यादित अर्थ होता, अर्थसंकल्प म्हणजे मतपेटीसाठीचे खाते बनले होते. आपल्या गरजा काय आहेत आणि भविष्यातील जबाबदाऱ्या काय आहेतहे ध्यानात ठेवून तुम्ही सर्व जण आपला घरगुती खर्चाचा ताळमेळ आखता. यापूर्वीच्या सरकारांना जी आश्वासने पूर्ण करता येऊ शकत नाहीत त्याबाबतच्या घोषणा करण्याचे अर्थसंकल्प हे माध्यम बनविले होते. मात्र देशाने आता विचार, भूमिका बदलली आहे.

१९२२ साली चौरी चौराच्या घटनेत ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना इतिहासाच्या पानांवर उचित स्थान देण्यात आले नाही हे दुर्दैवी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले. १०० वर्षांपूर्वी चौरी चौरात काय घडले, ती केवळ एक पोलीस चौकी जाळण्याची साधी घटना असल्यासारखे त्याकडे पाहिले गेले.

खरे तर त्याचा संदेश फार मोठा आणि व्यापक होता. ही आग केवळ पोलीस चौकीतील नव्हती, तर भारतीयांच्या हृदयातीलही होती, असे पंतप्रधान म्हणाले.

Prime Minister attacks Congress govt using budget keep eye on ballot boxes

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*