गुजरातमध्ये कोविड प्रतिबंधक लसीची खासगी किंमत २५० रूपये जाहीर; अन्य राज्यांमध्येही लवरकच घोषणा

वृत्तसंस्था

अहमदाबादनवी दिल्ली : गुजरतमध्ये खासगी रूग्णालयांमध्ये २५० रूपयांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी आज केली आहे. देशातल्या अन्य राज्यांमध्येही त्याचाच आसपास ही किंमत राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. Price of COVID19 vaccine in Gujarat will be Rs 250 in private hospitalsकेंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार, खासगी रुग्णालय, क्लिनिक, दवाखाने कोरोनाची लस लवकरच मिळू शकणार आहे. मात्र, खासगी ठिकाणी ही लस खरेदी करावी लागणार आहे. त्यासाठीची कमाल किंमत देखील सरकारकडून निश्चित करण्यात येईल. सरकारी रूग्णालयांमध्ये मात्र दिली जाणारी लस मात्र पूर्णपणे मोफत असेल. तिचा खर्च हा पूर्णपणे सरकारकडून उचलला जाईल.

किती असेल लशीची किंमत?

खासगी ठिकाणी दिल्या जाणाऱ्या लशीसाठी २५० रुपये किंमत निश्चित झाल्याची बातमी सूत्रांच्या हवाल्याने एएनआयने दिली आहे. गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी त्या राज्यापुरती तशी घोषणाही केली आहे. या किंमतीमध्ये १०० रुपये सेवा शुल्क देखील समाविष्ट असेल. यासंदर्भात केंद्र सरकारकडून किंवा आरोग्य मंत्रालयाकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली, तरी ती लवकरच केली जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देखील यासंदर्भात काही दिवसांपूर्वी संकेत दिले होते.

दरम्यान, राजेष भूषण यांनी आजपर्यंत देशात झालेल्या लशीकरणाविषयी देखील यावेळी माहिती दिली. आत्तापर्यंत देशातल्या ७७ टक्के अर्थात ६६ लाख ३७ हजार ०४९ आरोग्य कर्मचाऱ्यांना लशीचा पहिला डोस देण्यात आला असून ७० टक्के अर्थात २२ लाख ४ हजार ०८३ कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देऊन झाला आहे.

Price of COVID19 vaccine in Gujarat will be Rs 250 in private hospitals

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*