ज्यांनी रामाला नाकारले, तेच आता राम सगळ्यांचा असे म्हणताहेत; हाच बदल घडलाय, योगींची अखिलेश यादवांवर टिपण्णी

वृत्तसंस्था

लखनौ : ज्यांनी रामाचे अस्तित्व नाकारले. राम नुसता कल्पनाविलास आहे, असे म्हणालेत, तेच आज राम सर्वांचा आहे, असे म्हणताहेत. हाच तर बदल आहे आणि आम्ही तर राम सर्वांचा हे पूर्वीपासूनच म्हणत आलोय, अशी राजकीय टिपण्णी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. Previous governments wanted to keep all issues unresolved Chief Minister Yogi Adityanath

माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी काही दिवसांपूर्वीच मी अयोध्येला सहकुटुंब सहपरिवार जाऊन रामलल्लांचे दर्शन घेणार. त्यांची पूजा करणार असे म्हटले होते. तो संदर्भ घेऊन योगींनी वरील टिपण्णी केली आहे.१९९० मध्ये अखिलेश यांचे पिता मुलायम सिंग यादव यांनी मुख्यमंत्री असताना राम मंदिराच्या कारसेवकांवर गोळीबार केला होता. त्यावेळी शेकडो कारसेवक हुतात्मा झाले होते. जखमी झाले होते.
आता उत्तर प्रदेशासह देशातले वातावरण पूर्ण बदलले आहे. रामलल्लांच्या पूजेचे ट्विट अखिलेश यांनी केले आहे.

Previous governments wanted to keep all issues unresolved Chief Minister Yogi Adityanath

त्यावर योगींनी वर उल्लेख केलेली राजकीय टिपण्णी केली आहे. योगी म्हणाले, अनेकांनी रामाचे अस्तित्व नाकारण्याचा प्रयत्न केला. पण राम सत्य आहे. सत्य कितीही नाकारले तरी ते समोर उभे राहतेच. राम मंदिराचे भूमिपूजन झालेच आहे. भव्य राम मंदिर निर्माणालाही प्रारंभ झाला आहे. देशाची दशा आणि दिशा बदललेली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*