15 ला घेतली पत्रकार परिषद ; 18 ला सपत्नीक वाहिली श्रद्धांजली ; हे कसले ‘क्वाॅरंटाईन’ ? शरद पवारांचे दोन्ही दावे सपशेल खोटे

  • शरद पवारांच्या अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांच्या भेटीबाबतच्या दाव्यावर भाजपने सवाल केला आहे आणि राष्ट्रवादीचे प्रमुख खोटे बोलत आहेत असे सांगत अमित मालवीय यांनी एक व्हिडिओ शेअर केला त्यानंतर आणखी एक फोटो मालविय यांनी शेअर केला आहे. ज्यामुळे अनिल देशमुखांचा बचाव खुद्द पक्षश्रेष्ठी देखील करू शकणार नाहीत.Press conference held on the 15th; 18th Saptnik Wahili Tribute; What kind of quarantine is this? Both the claims of Sharad Pawar are completely false

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्राने महाराष्ट्रात राजकीय वादळ निर्माण झाले असून भाजपने महाराष्ट्र सरकारविरोधात एकामागून एक पुरावे सादर करण्याचा धडाका लावला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांचा बचाव केला खरा पण शरद पवार यांना त्यांच्याच दाव्याने घेरले .शरद पवार यांचा दावा खोटा असल्याचे सांगत अनिल देशमुख यांचा 15 फेब्रुवारीचा व्हिडिओ अमित मालविय यांनी शेअर केला आणि अनिल देशमुखांचे धाबे दणाणले. आता त्यांचा 18 तारखेचा फोटो देखील व्हायरल झाला आहे.

शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दावा केला की, अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांच्यात झालेल्या संभाषणाचे आरोप खोटे आहेत, कारण देशमुख यांना फेब्रुवारी महिन्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या दरम्यान शरद पवार यांनी अनिल देशमुख यांना रुग्णालयात दाखल केल्याचा पुरावाही दाखवला आणि ते म्हणाले की कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे त्यांना 5 ते 15 फेब्रुवारी दरम्यान नागपुरातील रुग्णालयात दाखल केले. यानंतर, 16 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी दरम्यान, ते घरी एकांतवासात होते .

शरद पवार म्हणाले, ‘अनिल देशमुख यांच्यावरील आरोप चुकीचे होते हे यावरून स्पष्ट झाले आहे, अशा परिस्थितीत त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परमबीर सिंग यांच्या आरोपांचा महाराष्ट्र सरकारवर परिणाम होणार नाही.

शरद पवार यांच्या पत्रकार परिषदानंतर भाजपने त्यांचे म्हणणे खोटे असल्याचा दावा केला आणि भाजप आयटी सेलचे राष्ट्रीय संयोजक अमित मालवीय यांनी त्यांच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उभे केले. अनिल देशमुख यांचा एक व्हिडिओ त्यांनी रीट्वीट केला असून त्यामध्ये ते पत्रकार परिषद घेत आहेत.
अमित मालवीय यांनी आरोप केला, ‘अनिल देशमुख 15 फेब्रुवारीपर्यंत रुग्णालयात आणि 16 ते 27 फेब्रुवारीला घरात एकांतात असल्याचा शरद पवारांचा दावा आहे. पण अनिल देशमुख 15 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेत होते.’

यानंतर मालविय यांनी आणखी एक पुरावा सादर केला आहे त्यांनी अनिल देशमुखांचा 18 फेब्रुवारीचा एक फोटो रीट्विट केला आहे ज्यात ते अपघातात मृत्यू झालेल्या पोलीस ऑफिसर संजय नारनवरे यांना शेवटची श्रद्धांजली वाहण्यासाठी आपल्या पत्नीसह उपस्थित होते. संजय हे अनिल देशमुखांच्या नागपूर येथील बंगल्याचे सुरक्षा रक्षक देखील होते असे त्यांनी ट्विट मध्ये नमूद केले आहे.

नागपुरातील निवासस्थानी गार्ड ड्यूटीवर असलेले पोलीस अंमलदार संजय नारनवरे यांचे अपघातात दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने कुटुंबातील एक सदस्य आम्ही गमावला. माझी पत्नी सौ.आरती देशमुख आणि मी नारनवरे यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला. : अनिल देशमुख

 

 

म्हणजेच अनिल देशमुख 15 ला पत्रकारांना भेटतात , 18 ला श्रद्धांजली वाहण्यासाठी जातात तर मग ते या दरम्यान वाझे यांना  भेटू शकत नाही का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे मात्र यावर अधिक प्रश्न विचारल्यावर शरद पवार को गुस्सा आता है |हा अशा प्रकारचा “क्वाॅरंटाईन ” असावा जिथे संबंधित व्यक्ती त्याच्या पत्नीसह शेकडो लोकांमध्ये फिरत आहे आणि त्यांचे जीवनही धोक्यात घालत आहे .असे ट्वीट मालविय यांनी केले आहे .

Press conference held on the 15th; 18th Saptnik Wahili Tribute; What kind of quarantine is this? Both the claims of Sharad Pawar are completely false

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*