राज्यातील 57 पोलिस, अधिकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलिस पदक; अर्चना त्यागी, संजय सक्सेना, शशिकांत सांडभोर, वसंत साबळे यांना राष्ट्रपती वरिष्ठ सेवा पदक


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्रातील 57 पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. त्यात 4 पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक असून 13 अधिकाऱ्यांना पोलिस शौर्य पदक तर 40 जणांना पोलिस पदक जाहीर केले आहे. Presidential Police Medal to 57 police officer staff in the state

राष्ट्रपती वरिष्ठ सेवा पदकाचे मानकरी

राज्य राखीव दलाच्या अपर पोलिस महासंचालक अर्चना त्यागी यांना राष्ट्रपती वरिष्ठ सेवा पदक जाहीर झालं आहे. डीजीपी संजय सक्सेना, सहाय्यक पोलिस आयुक्त शशिकांत प्रभाकर सांडभोर आणि सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक वसंत रामचंद्र साबळे यांनाही राष्ट्रपती वरिष्ठ सेवा पदक जाहीर झालं आहे.राष्ट्रपती शौर्य पोलिस पदकाचे मानकरी

महाराष्ट्रातील पोलिस उपनिरीक्षक मिठू नामदेव जगदाळे, पोलिस नाईक सुरपत बावाजी वाडे, हवालदार आशिष मारोती हलामी, विनोद चैत्राम राऊत, नंदकुमार उत्तरेश्वर आगरे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. एमसीव्ही माहेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक समीरसिंग द्वारकोजीराव साळवे, नायब हवालदार अविशान अशोक कांबळे, हवालदार वसंत भूछाया आत्राम आणि हमीत विनोद डोंगरे यांना राष्ट्रपती शौर्य पोलीस पदक जाहीर करण्यात आलं असून केंद्रीय गृहमंत्रालयाने या पुरस्कारांची घोषणा केली आहे.

राष्ट्रपती पोलिस पदक विजेते

डॉ. रविंद्र शिसवे (सहपोलिस आयुक्त पुणे), प्रविणकुमार पाटील (पोलिस उपायुक्त, नवी मुंबई), वसंत जाधव, (पोलिस उपायुक्त, भंडारा), कल्पना गाडेकर, (अँटी टेररिस्ट स्कॉड, सायबर सेल, नवी मुंबई), संगिता शिंदे-अल्फान्सो (पोलिस उपायुक्त, जात पडताळणी समिती),दिनकर मोहिते (पोलिस इन्स्पेक्टर, सिबिडी, |बेलापूर), मेघ:श्याम डांगे (पोलिस इन्स्पेक्टर, अक्कलकुवा, नंदुरबार), मिलिंद देसाई, (पोलिस इन्स्पेक्टर, शेड्युल ट्राईब छाननी समिती), विजय डोळस (पोलिस इन्स्पेक्टर, निजामपुरा पोलिस स्टेशन), रविंद्र दौंडकर (पोलिस इन्स्पेक्टर, वाशी), तानाजी सावंत (पोलिस इन्स्पेक्टर, कोल्हापूर), मनीष ठाकरे (पोलिस इन्स्पेक्टर, अमरावती शहर), राजू विडकर (पोलिस इन्स्पेक्टर, डि. बी. मार्ग पोलिस स्टेशन, मुंबई), अजय जोशी (पोलिस इन्स्पेक्टर, गुन्हे शाखा, अंधेरी, मुंबई), प्रमोद सावंत (पोलिस इन्स्पेक्टर, टेक्नॉलॉजी सेल, मुंबई), भगवान धबडगे (पोलिस इन्स्पेक्टर, देगलुर, नांदेड), रमेश कदम (पोलिस इन्स्पेक्टर खंडणी विरोधी पथक ठाणे), रमेश नागरूरकर (राखीव पोलिस दल, मुख्यालय, बुलडाणा), सूर्यकांत बोलाडे (असिस्टंट पोलिस सदइन्स्पेक्टर, रेल्वे पोलिस घाटकोपर), लीलेश्वर वारहडमरे (असिस्टंट पोलिस सबइन्स्पेक्टर, चंद्रपूर), भारत नाले (असिस्टंट पोलिस सबइन्स्पेक्टर वाहतूक शाखा, सातारा)

Presidential Police Medal to 57 police officer staff in the state

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती