लाल किल्ल्यातील हिंसाचाराचा राष्ट्रपतींनी केला निषेध, म्हणाले – प्रजासत्ताक दिनासारख्या पवित्र दिवसाचा अवमान दुर्दैवी

President Ram Nath Kovind condemns violence in Red Fort Republic Day in His Speech

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी शुक्रवारी संसदेच्या संयुक्त अधिवेशनात अभिभाषण केले. आपल्या भाषणात राष्ट्रपतींनी प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीतील हिंसाचाराचा आणि लाल किल्ल्यावरील हिंसेचा निषेध केला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले की, तिरंग्याचा अवमान करणे अत्यंत दुर्दैवी आहे. President Ram Nath Kovind condemns violence in Red Fort Republic Day in His Speech


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी शुक्रवारी संसदेच्या संयुक्त अधिवेशनात अभिभाषण केले. आपल्या भाषणात राष्ट्रपतींनी प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीतील हिंसाचाराचा आणि लाल किल्ल्यावरील हिंसेचा निषेध केला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले की, तिरंग्याचा अवमान करणे अत्यंत दुर्दैवी आहे.

आपल्या भाषणात राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, “तिरंगा आणि प्रजासत्ताक दिनासारख्या पवित्र दिवसाचा अवमान करणे अत्यंत दुर्दैवी आहे. राज्यघटना आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळवून देण्याचा अधिकार देते, तीच घटना आपल्याला शिकवते की कायदे व नियम तितकेच गांभीर्याने पाळले पाहिजेत.’

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शेतकरी संघटनांनी ट्रॅक्टर परेड काढली होती. त्या वेळी दिल्लीत भीषण हिंसाचार झाला. तोडफोड करत हजारो आंदोलक लाल किल्ल्यात घुसले. इतकेच नव्हे तर लाल किल्ल्याच्या तटबंदीवर निशाण साहिबचा झेंडा फडकावण्यात आला, ज्याचा निषेध करण्यात येत आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हादेखील दाखल केला असून कारवाई सुरू आहे.राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या भाषणात नवीन कृषी कायदा आणि त्यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचा उल्लेख केला. राष्ट्रपती राम नाथ कोविंद म्हणाले की, सध्या कृषी कायद्यांची अंमलबजावणी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आपले सरकार पूर्ण आदर ठेवेल.

President Ram Nath Kovind condemns violence in Red Fort Republic Day in His Speech

राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, माझे सरकार हे स्पष्ट करून सांगू इच्छित आहे की, तीन नवीन कृषी कायदे लागू होण्यापूर्वी जुन्या व्यवस्थेअंतर्गत येणाऱ्या हक्क आणि सुविधांमध्ये कोणतीही कपात केली नव्हती. उलट या कृषी सुधारणांच्या माध्यमातून सरकारने शेतकर्‍यांना नवीन सुविधा तसेच नवीन हक्क दिले आहेत.

Delhi Violence: Big revelation in Delhi violence, plot of violence from Khalistani Twitter handle

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था