मग शिवसेनेने महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केला नाही का? प्रवीण दरेकर यांचा संजय राऊत यांना सवाल

बिहारमध्ये नितीशकुमार यांनी मुख्यमंत्री होणे हा जनादेशाचा अपमान आहे, असे शिवसेना म्हणत आहे. मग महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणुकीत भाजपा एक नंबरचा पक्ष होता व शिवसेना तिसऱ्या नंबरवर होती, तरीही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला. मग तेव्हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान झाला नाही का? असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.  pravin darekar news


विशेष प्रतिनिधी

मुंबई : बिहारमध्ये नितीशकुमार यांनी मुख्यमंत्री होणे जनादेशाचा अपमान आहे, असे शिवसेना म्हणत आहे. मग महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणुकीत भाजपा एक नंबरचा पक्ष होता व शिवसेना तिसऱ्या नंबरवर होती, तरीही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला मग तेव्हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान झाला नाही का? असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. pravin darekar news

दरेकर म्हणाले की, शिवसेना व भाजपची युती असताना कमी संख्या असूनही महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होतो, तेव्हा जनतेचा अपमान झाला नाही का आणि आता नितिश कुमार यांचा पक्ष तिसऱ्या नंबर असतानाही ते मुख्यमंत्री होणार असतील, तर तिथल्या जनादेशाचा अपमान झाला असे बोलणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत व शिवसेना यांची भूमिका दुटप्पी आणि सोयीची आहे. pravin darekar news

खासदार संजय राऊत आणि त्यांच्या मुखपत्रातील अग्रलेखाचे आश्चर्य वाटते की शिवसेना आणि शिवसेना नेते आपल्या भूमिका एवढ्या जलद गतीने बदलत आहेत. दोन दिवसापूर्वी संजय राऊत यांनी सांगितलं, की नितीश कुमार यांना बिहारचे मुख्यमंत्री केले तर त्याचे सारे श्रेय शिवसेनेला जाईल. पण संजय राऊत त्यांचे मुखपत्र सामनातून लिहितात की, जर नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केले तर तिथल्या जनतेचा, जनाधाराचा अपमान होईल ही शिवसेनेची भूमिका दुतोंडी नाही काय असा सवालही दरेकर यांनी केला आहे.

दरेकर म्हणाले की, महाराष्ट्रात उद्योगधंदे बंद पडले आहेत, बेरोजगारीचा विषय वाढतोय आणि अशा या सगळ्या विषयांवर जनतेचा आवाज विधिमंडळात उठवण्याची वाट महाराष्ट्रातील जनता पाहतेय. पण या अधिवेशनापासून पळ काढण्याची भूमिका या सरकारची दिसत आहे. आता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हिवाळी अधिवेशनाचा कालावधी ठरवू असे सांगणारे सरकार अधिवेशनापासून पळ काढण्यासाठी कोरोनाचा आधार घेत हे अधिवेशन पुढे ढकलण्याचा प्रयत्न करीत आहे.

pravin darekar news

कोकणात निसर्ग वादळाच्याबाबतीत सरकारने जी मदत जाहीर केली ती अजूनही कोकणवासियांना पूर्ण मिळालेली नाहीत. त्यामुळे सरकारच्या फक्त घोषणाच होत आहेत, प्रत्यक्षात काहीच होत नाही असे स्पष्ट करताना दरेकर म्हणाले की,एसटीची सध्याची अवस्था कठीण असतानाही परिवहन मंत्री अनिल परब एसटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्याचे पगार दिले ते चांगले आहे, पण दोन महिन्यांच्या पगारांनी हा प्रश्न सुटणार नाही. आजचे मरण दोन महिन्यांनी पुढे ढकलले गेले आहे. मग २ महिन्यानंतर एसटीचं भवितव्य काय याचाही आघाडी सरकारने विचार करण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी नमुद केले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*