महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था टांगली वेशीला, आता तरी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राठोड प्रकरणात एफआयआर दाखल होण्यास वीस दिवस लागले. त्यानंतर दोन दिवस मुख्यमंत्र्यांनी राजीनामा खिशात ठेवला व तोपर्यंत सर्व पुरावे नष्ट झाले. तर सचिन वाझे प्रकरणात राजकीय वरदहस्त असण्याचा संशय आहे.Pravin Darekar lashes on Mharashtra govt.

कायदा व सुव्यवस्था राखणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र, वरील प्रकारच्या घडामोडींमुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.सचिन वाझे प्रकरणात पोलिस आयुक्तांपासून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामध्ये अनेक बैठका होत आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे उच्च पोलिस अधिकाऱ्यांसहित इतर राजकीय नेत्यांपर्यत पोहोचतात की काय, या चिंतेमुळे या बैठका होत आहेत का, असा सवाल जनतेच्या मनात येत असल्याचे दरेकर यांनी सांगितले.

वाझे प्रकरणात बदललेल्या नंबर प्लेट तपासल्या, डिजिटल शूटिंग काढण्यात आले, तसेच सचिन वाझे राहत असलेल्या साकेत सोसायटीमधील सीसी टीव्ही फुटेज गायब केल्याचा संशय एनआयएने व्यक्त केला आहे; परंतु पोलिसांच्या रेकॉर्डवर यापैकी काहीच नाही, याचा अर्थ पोलिसांनी ते सगळे पुरावे घेतले आणि नष्ट केले का, असा सवाल दरेकर यांनी केला.

Pravin Darekar lashes on Maharashtra govt.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*