रिलायन्सच्या नावावर घसा कोरडा करणाऱ्यांना चोख उत्तर, प्रवीण दरेकर यांची टीका

शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने कारण नसताना रिलायन्सला लक्ष्य करून देशभर संभ्रम निर्माण करायचं काम विरोधक करत आहेत. रिलायन्सने काढलेल्या परिपत्रकानं त्यांच्या नावावर घसा कोरडा करणाऱ्यांना चोख उत्तर मिळालं आहे, असे विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले. Praveen Darekar criticism of those who dry their throats in the name of Reliance


विशेष प्रतिनिधी

मुंबई : शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने कारण नसताना रिलायन्सला लक्ष्य करून देशभर संभ्रम निर्माण करायचं काम विरोधक करत आहेत. रिलायन्सने काढलेल्या परिपत्रकानं त्यांच्या नावावर घसा कोरडा करणाऱ्यांना चोख उत्तर मिळालं आहे, असे विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

शेतकरी आंदोलकांना सांगितलं जात आहे, त्याप्रमाणे कंत्राटी शेतीशी आपला संबंध नाही, हे स्पष्ट करणारं परिपत्रक सोमवारी रिलायन्सच्यावतीने जारी करण्यात आले. रिलायन्सने शेतजमिनी विकत घेण्याचा विषय नाही. तिथे येण्याचाही मानस नाही असं स्पष्ट करत पुरवठादार सुद्धा हमीभावाने खरेदी करतील अशा प्रकारची भूमिका जाहीर केली आहे. याबाबत बोलताना दरेकर म्हणाले.रिलायन्सला टार्गेट करून विरोधक कृषी विधेयकांबाबत चुकीचं चित्र निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत. शेतीविधेयकांच्या संदर्भात रिलायन्सच्या स्पष्टीकरणाने सरकारच्या बाजूने बळकटी मिळेल. शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम करायचा प्रयत्न केला जात आहे त्याला मूठमाती मिळेल. देशातल्या व राज्यातल्या शेतीसाठी आपण कटीबद्ध आहोत. हा विश्वास देशातील शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न रिलायन्सने केला आहे.

Praveen Darekar criticism of those who dry their throats in the name of Reliance

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*