औरंगाबाद नाव ऐतिहासिक, ते तसेच राहू द्या; पुण्याचे नामांतर संभाजीनगर करा; प्रकाश आंबेडकरांची मागणी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या राजकीय वादात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी औरंगाबादच्या नामांतरास आक्षेप घेतला असून उलट पुणे जिल्ह्याचे नामकरण संभाजीनगर करण्याची मागणी केली आहे. त्यामागील ऐतिहासिक घटनांचाही आंबेडकरांनी हवाला दिला आहे. prakash ambebkar oppose renaming of aurangabad, demands pune sholud be renamed sambhaji nagar

औरंगाबाद महापालिका निवडणुक तोंडावर आलेली असताना भाजपाने औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा उपस्थित करून शिवसेनेची कोंडी केली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार संभाजीराजे यांनी औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करणे हा अस्मितेचा आणि जिव्हाळ्याचा विषय असल्याचे सांगितले आहे. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी मात्र, आक्षेप घेतला आहे.एबीपी माझाशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद ऐवजी पुण्याला संभाजी महाराजांचे नाव द्यावे अशी मागणी केली आहे. “पाच वर्ष सरकारमध्ये असताना भाजपा-शिवसेनेने औरंगाबादचे नाव का बदलले नाही, याचा खुलासा त्यांनी आधी करावा. औरंगाबाद हे ऐतिहासिक शहर आहे. मुघल काळात औरंगाबाद दुसरी राजधानी होती.

prakash ambebkar oppose renaming of aurangabad, demands pune sholud be renamed sambhaji nagar

औरंगाबाद ऐतिहासिक शहर आहे आणि ऐतिहासिकच राहायला हवे. छत्रपति संभाजी महाराज यांची पुणे जिल्ह्यातील वढू गावात समाधी आहे. त्यामुळे संभाजी महाराजांचे स्मरण राहावे, असे वाटत असेल तर ती योग्य भूमी पुणे शहर आणि जिल्हा आहे. त्यामुळे पुण्याला संभाजी महाराजांचे नाव दिले तर अधिक उचित होईल,” असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*