स्वातंत्र्योत्तर काळात नेता ही शिवी झालीय , योगी आदित्यनाथ संतापले; गोंधळी आमदारांना खडसावले

वृत्तसंस्था

लखनौ : स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये नेता हा शब्द आदर व्यक्त करण्यासाठी वापरला जायचा. मात्र स्वातंत्र्यानंतर हळूहळू हा शब्द आक्षेपार्ह शब्द (शिवी) म्हणून वापरला जाऊ लागला. यासाठी सर्वच जण जबाबदार आहेत, असे संतप्त उदगार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काढले.post-independence period the leader was insulted Yogi Adityanath became angry Confused MLAs scolded

विधानसभा अधिवेशनामध्ये सभागृहात आरडाओरड करून गोंधळ घालणाऱ्या आमदारांना त्यांनी फैलावर घेतले. वर्तणुकीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
योगी आदित्यनाथ म्हणाले, सभागृहामध्ये आरडाओरड करण आमदारांना शोभत नाही.आपल्या वागणुकीतून समाजसमोर आदर्श निर्माण केला पाहिजे. विवाहासह कुठल्याही फसव्या किंवा अयोग्य मार्गाने धर्मांतराला आळा घालण्याच्या उद्देशाने तयार केलेलं विधेयक विधानसभेमध्ये बुधवारी विरोधकांच्या निषेधामध्ये आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आलं.

योगी आदित्यनाथ बोलण्यासाठी उभे राहिले तेव्हा विरोधकांचा गोंधळ सुरु होता. त्यामुळेच योगींनी कठोर शब्दामध्ये नाराजी व्यक्त केली. नेत्यांना योग्य वर्तनाचा सल्ला दिला.
बुधवारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेत्या आराधाना मिश्रा आणि विधानसभेतील बसपचे नेते लालजी वर्मा यांनी विरोध केला असतानाही धर्मांतरविरोधी विधेयक मंजूर करण्यात आलं. त्यावेळी योगी बोलण्यासाठी उभे राहिले तेव्हाही गोंधळ सुरुच होता. यासंदर्भात नाराजी व्यक्त करताना योगी म्हणाले, काही लोकांना आपण सभागृहामध्ये आरडाओरड केला की आपलं कौतुक होईल असं वाटतं. मात्र, त्यांचा तो गैरसमज आहे.

लोकं असं वागणं सकारात्मकरित्या घेत नाहीत. वागणुकीमधून लोकांसमोर आदर्श निर्माण करणं आपलं कर्तव्य आहे,” अशा शब्दांमध्ये त्यांनी आरडाओरड करणाऱ्या नेत्यांना सुनावलं.

बेकायदेशीर धर्मांतर प्रतिबंधक विधेयक

  •  केवळ विवाहाच्या उद्देशाने धर्मांतर केले असल्यास हा विवाह रद्दबातल होणार
  • विवाहनंतर धर्म बदलू इच्छिणाऱ्यांना जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागणार आहे.
  • उत्तर प्रदेश बेकायदेशीर धर्मांतर प्रतिबंधक विधेयक गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये काढलेल्या अध्यादेशाची जागा घेणार आहे.
  •  उल्लंघन करणाऱ्यांना १० वर्षांपर्यंतची कैद आणि कमाल ५० हजार रुपये दंडाची तरतूद आहे.

post-independence period the leader was insulted Yogi Adityanath became angry Confused MLAs scolded

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*