कोरोना संकटानंतरचा भारत पूर्वीपेक्षा वेगळा, परराष्ट्र मंत्र्यांचा चीनला इशारा


कोरोना संकटानंतरचा भारत पूर्वीपेक्षा खूप वेगळा आहे. आपल्यासाठी आज आरोग्य आणि कल्याण हे महत्त्वाचं आहे. म्हणूनच सरकारने अर्थसंकल्पात आरोग्य आणि कल्याण क्षेत्राला इतके मोठे प्राधान्य दिले असल्याचा इशारा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चीनला दिला आहे.Post-Corona crisis India is different than before Foreign Minister sjaishankar warns China


वृत्तसंस्था

विजयवाडा : कोरोना संकटानंतरचा भारत पूर्वीपेक्षा खूप वेगळा आहे. आपल्यासाठी आज आरोग्य आणि कल्याण हे महत्त्वाचं आहे. म्हणूनच सरकारने अर्थसंकल्पात आरोग्य आणि कल्याण क्षेत्राला इतके मोठे प्राधान्य दिले असल्याचा इशारा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चीनला दिला आहे.

जयशंकर म्हणाले की, गेल्या एक वर्षात भारतीय लष्कराच्या कमांडर्सनी त्यांच्या चिनी समकक्ष अधिकाऱ्यांशी नऊ वेळा चर्चा केली आणि ही चर्चा यापुढेही सुरू राहील. चिनी लष्कराने पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष ताबा रेषेवर (एलएसी) पूर्वेकडील स्थान एकतर्फी बदल करण्याचा प्रयत्न करून या प्रदेशातील शांतता भंग केली आहे. भारतीय सैन्य दलांनी या प्रयत्नांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. असे एकतर्फी प्रयत्न अजिबात स्वीकारले जाणार नाहीत.जयशंकर अर्थव्यवस्थेबद्दलही बोलले. येत्या वर्षात आपण दोन आकडी ११ टक्क्यांहून अधिक आर्थिक विकासदर गाठू. आमच्यासाठी हा मुद्दा कोरोना रिकव्हरी आणि आर्थिक पुनर्प्राप्तीचा आहे, भविष्यातील दिशा काय असावी? हे अर्थसंकल्पातून स्पष्टपणे दिसून येतंय, असं जयशंकर म्हणाले.

ते म्हणाले की, मैदानावरील चर्चेचा निर्णय घेण्यात आलेला नाही. गेल्या वर्षीच्या घटनांनंतर आम्ही तेथे चिनी सैनिकांच्या गर्दीतून आलेल्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी मोठ्या संख्येने सैनिक तैनात केले आहेत. मागच्यावर्षी लडाखमध्ये सीमावाद सुरु झाल्यापासून भारत आणि चीनमध्ये आतापर्यंत लष्करी चर्चेच्या नऊ फेऱ्या झाल्या आहेत. लडाखमधील आव्हानाचा विचार करता, भारताने तिथे मोठया प्रमाणावर सैन्य तैनाती केली आहे.

जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आपले समकक्ष चीनचे परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्र्यांसोबत चर्चा केली आहे. पण त्यातून फार मोठी प्रगती साध्य झालेली नाही. आतापर्यंत झालेल्या चर्चेतून जमिनीवर बदल दिसून आलेला नाही, असे जयशंकर यांनी विजयवाडा येथे पत्रकारांना सांगितले. सैन्य माघारीचा विषय हा खूप जटिल मुद्दा आहे. तुम्हाला तुमची भौगोलिक स्थिती आणि तिथे काय घडतय याची माहिती असली पाहिजे. हे सर्व लष्करी कमांडर्सच ठरवतील, असे जयशंकर यांनी सांगितले.

Post-Corona crisis India is different than before Foreign Minister sjaishankar warns China

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती