Pondicherry Assembly Election 2021 : पुद्दुचेरीचा जांगडगुत्ता; राहुलजींचा पायगुण भोवणार की नारायण सामींचा अप्रामाणिकपणा?


विशेष प्रतिनिधी

पुद्दुचेरी विधानसभा निवडणूकीपूर्वीच नारायण सामी सरकारचा सफाया झाला. त्यांनी राज्यपाल किरण बेदी यांच्याविरूद्ध तक्रारी करून त्यांना हटवायला लावले. (म्हणजे तसा राजकीय भास निर्माण केला.) केंद्राने किरण बेदींना हटविले. तरीही नारायण सामींचे सरकार जायचे ते गेलेच. किरण बेदींवर आरोप करण्याची शक्ती नारायण सामींनी आपल्याच आघाडीतले काँग्रेसचे आणि संलग्न आमदार टिकविण्यासाठी खर्ची घातली असती, तर ही वेळ येतीच ना…!!

Pndicherry Assembly Election 2021, who is responsible for failure?, rahul gandhi or v. narayansami?

पण ते घडले नाही. काँग्रेस तिथे संघटनात्मक पातळीवर इतरांच्या तुलनेत बऱ्या स्थितीत असली तरी तिला सरकार गेल्याने राजकीय फाऊल झाला आहे. नारायण सामींनी सत्तेचा संतुलन पाच वर्षे टिकवून ठेवले. काँग्रेसश्रेष्ठींनी त्यांना दिल्लीतून पुद्दुचेरी पाठविले होते. ते कामगिरी चांगली पार पाडत होते. पण अखेरच्या ओव्हरमध्ये त्यांनी घात करून घेतला.

राहुलजींना पुद्दुचेरीत आणून देखील फारसा फायदा झाला नाही. उलट त्यांच्या समोर एका मच्छिमार महिलेने त्यांच्या सरकारची अब्रू काढली. राहुलजींना तिच्या म्हणण्याचे चुकीचे भाषांतर ऐकवून नारायण सामींनी ती वेळ मारून नेली, सोशल मीडियामुळे ते उघडे पडले. महिला काँग्रेस सरकारने मदत केली नसल्याची तक्रार करत होती, हे सोशल मीडियातून बाहेर आल्याने नारायण सामींवर अप्रामाणिकतेचा शिक्का बसला. तो काँग्रेसला २०२१ च्या निवडणूकीत भोवण्याची शक्यता आहे.

त्यातही बघा, राहुलजी आले… तरी ते सरकार वाचवू शकले नाहीत, असा प्रचार करायला अण्णा द्रमूक, भाजप मोकळे झाले.

Pndicherry Assembly Election 2021, who is responsible for failure?, rahul gandhi or v. narayansami?

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी