कोरोनाच्या मुद्द्यावरूनही “यांचे” राजकारण सुटेना; ममता, भूपेश बघेल यांनी पंतप्रधानांची बैठक टाळली

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या प्रकोल्पाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेली मुख्यमंत्र्यांची बैठक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करत असताना तेथेही काही मुख्यमंत्र्यांचे राजकारण सुटलेले नाही.politics of the corona issue either; Mamata, Bhupesh Baghel avoided the PM’s meeting

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी वेगवेगळी कारणे देऊन पंतप्रधानांच्या बैठकीला उपस्थित राहण्याचे टाळले आहे.ममता बॅनर्जी यांनी आपण प्रचारात मग्न असल्याने बैठकीस उपस्थित राहू शकणार नाही असे कळविण्याची बातमी काही माध्यमांनी दिली आहे. परंतु मुख्यमंत्री कार्यालयाकडून तसा कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेता त्यावर ठोस उपाय करण्याची गरज आहे. हा राजकारणाचा विषय असू शकत नाही. तरीदेखील ममता बॅनर्जी आणि काँग्रेसचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे मात्र

त्या बैठकीकडे पक्षीय दृष्टिकोनातूनच बघत असल्याचे त्यांच्या वर्तणुकीतून स्पष्ट झाले आहे.भाजपचे नेते अमित मालविया यांनी यासंदर्भात ट्विट करून दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर टीका केली आहे.

politics of the corona issue either; Mamata, Bhupesh Baghel avoided the PM’s meeting

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*